History, asked by janhavim28, 11 months ago

Hi mate good afternoon
give me the note on
darpan vruttapatra in marathi

its urgent plz help me​

Answers

Answered by staeen
1

Explanation:

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी इ.स. १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात "मराठी पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे.

या वृत्तपत्राने समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असे. सुरुवातीला हे पाक्षिक होते. भारतीयांना 'देश-काळ-परिस्थिती'चे आणि 'परदेशी राजव्यवहारा'चे ज्ञान मिळवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करणे मागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत

१९९७-९८साली मराठीत एकूण १५६१ वृत्तपत्रे असल्याचे वाचण्यात आले आहे. यांत २२५ दैनिके आहेत. दर्पण वृत्तपत्राने मराठी वृत्तसृष्टीत नवे पर्व सुरू केले , बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या "दर्पण" मध्ये समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य तत्वावर समाजाची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला ,जांभेकरांनी या पत्रातून नवीन पर्व निर्माण केला हे पत्र साडेआठ वर्ष चालले,पहिल्या वर्ष अखेरीस 300 वर्गणीदार होते.

Similar questions