India Languages, asked by tanishapunjabi15, 6 months ago

hi, whoever knows marathi pleaseeeee can you write a story writing on hare and the tortoise according to the above pic please very urgent​

Attachments:

Answers

Answered by ARMY9394
15

शीर्षक : ससा आणि कासव

एकदा एका जंगलात , एक ससा आणि कासव चांगले मित्र होते. ससा नेहमी त्याच्या वेगाने उड्या मारण्याच्या बढाया मारत होता. कासवाला चिडवू लागला. मग एके दिवशी कासवाला राग आला आणि त्याने सास्याला पैज लावायचे सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सास्याने ठरवले की मी कास्वशी पैज लावून त्याला हरवणार. त्यांची शर्यत लागली.

ससा वेगाने धावू लागला आणि कासव हळूहळू चालू लागला. ससा चपळ होता. सशाला खूप गर्व हो ता. तो वेगाने धावत पुढे गेला आणि त्याने पाहिले की कासव अजून खूप मागे आहे. म्हणून त्याने आराम करायचे ठरवले.

सस्यला पुढे लुसलशीत गवत दिसते. ससा गवत खाऊन सुस्त पडतो.

कसव मात्र हे सगळं बघतो पण चालतच राहतो. कासव शर्यत जिंकतो.

ससा उठल्यावर बघतो तर काय कासव जिंकलेला असतो.

तात्पर्य : हळु आणि स्थिर शर्यत जिंकते

Hope this helps you...

Answered by ssupekar819
0

Answer:

एका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवासमोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.

कासव म्हणाले, ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल, तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्याआधी तू तिथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईल आणि जर मी आधी पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल आहे कबूल?

सस्याने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले. थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपलया गतीने चालले होते.

कासव खूपच मागे राहिलेले बघून सस्याने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहे. थोडावेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे. म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू.

एखादे वेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यातच आपण त्याच्या पुढे जाऊ, असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.

कासव मंद गतीने चालत चालत सश्याच्या पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच होता. सश्याला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले, तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली.

Similar questions