History of computer in Marathi language
Answers
संगणकाचा इतिहास
आपल्या संगणकाची सुरुवात आज १ centuryव्या शतकातील इंग्रजी गणिताचे प्राध्यापक चार्ल्स बॅबेजपासून झाली. त्यांनी इंजिन नालिटिकल इंजिनची रचना केली आणि हीच रचना आजच्या संगणकांच्या मूलभूत चौकटीवर आधारित आहे. ... याला अॅटॅनासॉफ-बेरी कॉम्प्यूटर (एबीसी) म्हटले गेले ...
_______________________________________
असे म्हटल्या जाते कि, " गरज शोध कार्याची जननी आहे. " हि म्हण संगणकाच्या बाबतीत सुद्धा लागू होते. आज आपण जो संगणक पाहत आहोत. त्याचा शोध हा लवकरात लवकर आणि बिनचूक गणितीय क्रिया करण्याच्या आवश्यकतेतुन लागला. सुरुवातीपासून ते आता पर्यंत यात अनेक आणि गरजेनुसार बदल करण्यात आले आणि आजचा संगणक तयार झाला.
तुम्हाला माहित आहे का ? इ.स. पूर्व ३००० ते ५००० या कालावधी मध्ये बेरीज, भागाकार, गुणाकार, वजाबाकी, करण्याकरिता चीन, जपान, रोम इ. देशात अबॅकसचा वापर केला जात असे. आज पण एशिया, अफ्रिका, आणि इतर अनेक ठिकाणी अबॅकसचा उपयोग केला जातो. अबॅकस हे यंत्र वरील प्रमाणे दिसत असेे.
१६४२ मध्ये ब्लेस पास्कल याने एक गणक यंत्र तयार केले. पास्कल हा फ्रेंच गणिततज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, कॅथॉलिक तज्ज्ञ होता. ब्लेस पास्कल याने वडिलांना हिशोबाच्या कामात मदत करण्याच्या उद्देशाने १६४२ मध्ये बेरीज व वजाबाकी करणारे एक यंत्र तयार केले. हे यंत्र तयार करण्याचा व त्याचे वितरण करण्याचा अधिकार ब्लेस पास्कल यांना १६४९ मध्ये देण्यात आला. प्रामुख्याने आकडेमोडीसाठी त्याचा वापर होत असे. परंतु या यंत्रावर गुणाकार व भागाकार करता येत नसत. तसेच ते महाग व क्लिष्ट असल्याने त्याचा फारसा प्रसार झाला नाही. १६७१ मध्ये गणिततज्ज्ञ गॉट फ्रिडने पास्कलच्या यंत्रात बरेच फेरबदल करून बेरीज, वजाबाकी सोबतच गुणाकार, भागाकार व इतरही काही गणितीय क्रिया करता येतील असे यंत्र तयार केले.
जॉन नेपियर या गणिततज्ज्ञाने १७ व्या शतकात गुणाकार व भागाकार करण्याकरिता लॉगॉरिथमचा शोध लावला. याच्या सहाय्याने गुणाकार व भागाकार ह्या क्रिया जलद गतीने करणे शक्य झाले.
चार्लस बॅबेज ज्यांना गणिततज्ज्ञ संबोधिले जाते. चार्लस बॅबेज केंब्रिज विद्यापीठात नोकरीला होते. त्यांनी १८३० मध्ये एक नवीन यंत्र शोधून काढले, त्याच यंत्राला DifferentialEngine असे म्हटल्या जाते. या यंत्राचा वापर आकडेमोड करण्याकरिता केला जात असे, तसेच बीजगणिते सुद्धा सोडविता येत असत. या यंत्राचा उपयोग करून वीस दशांश चिन्हा पर्यंत
चार्लस बॅबेज
उत्तरे मिळत असत. आणि याच यंत्राचा उपयोग करता करता चार्लस बॅबेज यांनी AnalyticalEngine तयार केले. या यंत्राचा बाह्य आराखडा हा आजच्या आधुनिक संगणकाशी थोडाफार मिळता जुळता होता. Analytical Engine यंत्राचे मुख्य पाच भाग होते. त्यापैकी पहिल्या भागात माहिती साठविली जात असे, दुसऱ्या भागात आकडेमोड केली जावून तिसऱ्या भागात माहिती स्वीकारणे आणि चौथ्या भागात उत्तरे दाखविणे व पाचव्या भाग हा चारही भागांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असे. चार्लस बॅबेज यांनी तयार केलेले Analytical Engine हाच आधुनिक संगणकाचा पाया आहे. असे म्हटले किंवा समजले जाते आणि त्यामुळेच चार्लस बॅबेज यांना ' संगणकाचा जनक ' असे म्हणतात.
१८८० साली अमेरिकेत झालेल्या जनगणनेचे निष्कर्ष काढण्याचे काम सात वर्ष चालू होते. निष्कर्ष लवकरात लवकर निघावेत ह्यासाठी अमेरिकन सरकारने एक योजना जाहीर केली. निष्कर्ष काढण्याचे काम वेगाने व अचूक करणारी पद्धत शोधून काढणाऱ्यास बक्षीस जाहीर केले. आणि त्यावेळेस संगणक विभागात कार्य करीत असलेले हरमन होलरीथ यांनी पंचकार्ड पद्धती शोधून काढली पंचकार्डवर छिद्र पाडण्यासाठी पंचयंत्र व ती माहिती वाचण्यासाठी दुसरे यंत्र त्यांनी तयार केले. आणि ह्याच पद्धतीचा उपयोगकरून १८९० च्या जनगणनेचे कार्य फक्त तीन वर्षात पूर्ण झाले.
वरील प्रकारचे यंत्र तयार करण्यासाठी व विविध प्रकारच्या कार्यालयीन नोंदी ठेवण्यासाठी १६ जुन १९११ मध्ये IBM (International Business Machine Corporation ) या नावाने कंपनी स्थापन झाली आणि इथूनच खरे पाहता संगणकाचा युगाला प्रारंभ झाला. हॉवर्ड एकीन यांनी १९४४ मध्ये Mark I या संगणकाची निर्मिती केली. या संगणकामध्ये ३०० व्हॅक्युम ट्यूब्सचा वापर करण्यात आला होता. आणि हाच पहिला "इलेक्ट्रानिक डिजिलय कॉम्प्युटर" होय.
दुसऱ्या महायुद्ध नंतर संगणकाच्या विकासामध्ये कमालीची भर पडली. औद्योगिक क्षेत्रातून संगणकाच्या मागणीने जोर धरला. त्यामुळे संगणकाच्या विकासाचे कार्य अधिक जोमाने सुरु झाले.
HOPE IT HELPS YOU ...:D
PLEASE MARK THIS AS THE BRAINLIEST