Hindi, asked by vaibhavpoddarsj02365, 3 months ago

Holi in Marathi of a 10 line of a picture composition please friend send me​

Answers

Answered by SujalBendre
2

Answer:

होळी

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला देशभर होळी साजरी केली जाते . आमच्या परिसरात पण होळी साजरी केली जाते . गावातील लोक आपापल्या घरातील केर कचरा एकत्र करतात . होळीच्या खड्ड्यात होळीसाठी झाडांच्या फांद्या, पाने कोणीही तोडत नाहीत . सुकलेले गवत, काटक्या , शोणाच्या गौरी करतात. त्याचीच होळी पेटवतात.

होळी हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो. होळी चा सण हिंदू धर्मात एक मुख्य सण मानला जातो. होळी ला होळी पोर्णिमा आणि रंगांचा सण हि म्हंटल जात. लहान मुल तर होळी सुरु होण्या पासून ते होळी च्या संपे पर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्या करतात.

प्रत्येक गावात आणि शहरात होळी दर वर्षी बनवली जाते, आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी होळी ची जागा ठरलेली असते. होळीचा दुसरा दिवासी रंग पंचमी किवा धुलीवंद साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सगळे एक मेकांना रंग लावतात आणि आनंदाने साजरी करतात. होळीचा हा सन रंग लाऊन साजरा करतात म्हणून होळीला रंगांचा उत्सव असे हि म्हणतात.

2nd Easy :-

आम्ही लहान असताना शेणाच्या चाकोळ्या बनवायचो . होळी सुरू होण्यापूर्वी महाशिवरात्रीला आम्ही चाकोळ्या बनवण्यास सुरुवात करायचो. दोन्ही हाताचा अंगठा आणि पहिले बोट एकमेकांना जॉईन करून त्यामध्ये शेणाचा गोळा ठेवून चाकुळी बनवायचो . तसेच ,चंद्र, सुर्य , नारळ बनवून सुकवायचे. चाकुळी ची माळा बनवायचे . चाकुळी ची माळा बनवण्याची स्पर्धा लागायची. कुणाची सर्वात मोठी माळ बनेल . ह्या चाकोळ्या बनवण्यास आम्हाला खूप आनंद मिळायचा.

लहान-थोर सारेजण होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. होळी भोवती सारेजण फेर धरतात, नाचतात आणि गातात. असे सांगताले जाते कि होळीच्या अग्नीत सर्व वाईट गोष्टीनचा अंत होतो. घराघरातील लोक एकत्र येतात आणि हा सण एकत्र साजरा करतात. त्यामुळे होळी हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे. मला हा होळीचा सण खूप आवडतो.

Similar questions