India Languages, asked by gaurichaubey009, 5 months ago

how holi celebrate information in marathi​

Answers

Answered by cascharish
2

Answer:

होळीचा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. यावर्षी 9 मार्च 2020 या दिवशी होळी तर 10 मार्च 2020 ला रंगपंचमीचा सण आहे. संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा केला जातो. एवढंच नाही तर या सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी सर्वांना होळी माहिती (holi festival information in marathi) असायलाच हवी. होलिकादहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून धुळवड साजरी केली जाते. भारतात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, आसाम, बनारस, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, मथुरा - वृंदावन, नागालॅंड, ओरिसा, पांडेचरी, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड या ठिकाणी होळी साजरी केली जाते.

भारतात प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात होळीचा सण शिमगा या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच शिमग्यालाही कोकणात उत्साहाचं वातावरण असतं.

PLZ MARK ME AS A BRAINLEIST.

Similar questions