Hindi, asked by karajrandhawa5584, 1 year ago

How I spent my summer vacation letter writing in Marathi Marathi Marathi

Answers

Answered by unitedwer
3

Explanation:

उन्हाळा' येतो आहे याची दवंडी आमच्या घरात पिटली जायची ती दुचिवावरच्या अर्थसंकल्पाने ! आम्ही येऊ घातलेल्या परीक्षेच्या तयारीत गुंग असताना, दुचिवा जास्त वेळ बघण्याबाबत इतरवेळी आम्हाला ओरडणारे बाबा, तहानभूक बाजूला सारून कागदपेन घेऊन अर्थसंकल्पाची टिपणं काढत जेव्हा आमच्या शेजारी येऊन बसायचे तेव्हा आपल्याला समदुःखी मिळाल्याच्या आनंदाने खूऽप छान वाटायचं. बालवाडी/पहिलीत होते तेव्हा त्यावेळच्या साध्या बॉलपेनांनी काही लिहिल्यास एक आगळाच सुगंध यायचा, जो जास्तीत जास्त घेता यावा म्हणून,"आणखी लिहा बाबा, आणखी लिहा !" असा धोसरा बाबांच्या मागे लावायचे ! पुढे पुढे मात्र ओ की ठो कळत नसलेल्या त्या अर्थसंकल्पाचा खूप राग यायचा पण त्यामुळेच की काय दुचिवाकडे आपोआपच दुर्लक्ष होऊन अभ्यासात मन लागायचं.

एप्रिलमध्ये अपेक्षित असलेल्या स्पर्धापरीक्षा नेहमीच कशा काय प्रिपोर्न (?) होऊन फेब्रुवारीत यायच्या कोण जाणे ! नेहमीच्या परीक्षांपेक्षा त्या परीक्षांचं अप्रूप जास्त असल्याने त्यांच्या अभ्यासात गुंग झाल्याने दुर्लक्षित पडलेली शालेय वह्यापुस्तके झटकली जाऊन परत अभ्यासायला घ्यावी लागायची. डोक्याला काही खाद्य देणाऱ्या स्पर्धापरीक्षांची परीक्षणपद्धती अवलंबण्याऐवजी घोकंपट्टीला महत्त्व देत असलेली ही शालेय परीक्षापद्धती मला कधीच रुचली नव्हती, पण न आवडून सांगते कोणाला? नावडीनेच तरीही मुद्दामहून करायला घेतलेल्या अशा या पाठांतरात माझी लवकर लवकर प्रगती कधीच व्हायची नाही पण परीक्षेची तारीख जवळजवळ येत जायची त्यामुळे होळीला वेगळ्याच अर्थाने अभ्यासाची 'बोंब' उडायची. शाळेत गेलं की दोस्तांना "तुझे किती धडे झाले? लेखककवी पाठ झाले का?" वगैरे प्रश्न विचारणं मग अगदी ठरलेलंच असायचं. होळीची पूजा वगैरे करणे प्रकार कधी केले नसले तरीही ती जळते ते बघायला रात्र जागवणे मात्र हमखास करायचो. होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीला एकमेकांना चोपडल्या जाणाऱ्या त्या चित्रविचित्र प्रकारच्या रंगांमुळे ज्यात वॉर्निश वगैरे सारखेही रंग अंतर्भूत असायचे, बघूनच कसंसं व्हायचं अगदी. निख्खळ गुलाल किंवा कुठल्या फुलोत्पादित रंगांनी खेळली जावी अशी रंगपंचमी कधीच पहायला मिळाली नाही त्यामुळे मी कधीच रंगपंचमी खेळले नसले तरीही मी गच्च बंद ठेवलेल्या खोलीच्या खिडकीला कोणाच्या नकळत किलकिलं करून बाहेर रंग खेळणाऱ्या इतरांचा खेळ पाहायला धमाल मजा यायची.

Similar questions