how save erath in marathi
Answers
Answer:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त संसाधनं उपलब्ध आहेत. या पृथ्वीवर मनुष्याकरीता पशु पक्ष्यांकरीता तसच झाडा वेलींकरीता पाणी मिळतं. श्वास घेण्याकरीता प्राणवायु प्राप्त होतो या सोबतच पृथ्वीवर आपल्या जगण्यासाठी चांगले वातावरण देखील उपलब्ध आहे.
या धरतीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणुनच आपण सर्वांनी या धरतीचे रक्षण करावयास हवे. परंतु आज मनुष्य या पृथ्वीचे संरक्षण करण्या ऐवेजी तिच्या अस्तित्वालाच नष्ट करावयास निघाला आहे.
माणुस आज स्वतःच्या स्वार्थाकरीता आणि भौतिक सुखाच्या हव्यासापायी नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करायला निघाला आहे यामुळे ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या उग्र रूप धारण करतायेत व पर्यावरणाचे प्रदुषण सतत वाढत आहे. यामुळे केवळ पृथ्वीचे जीवन नष्ट होण्याचा धोका वाढला आहे असे नव्हें तर संपुर्ण मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसते आहे.
आज पृथ्वीला संरक्षित करण्याकरीता लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी पृथ्वीला सुरक्षित करण्यासाठी धरतीला संरक्षण देणारे काही स्लोगन्स् देत आहोत. याला वाचुन आपल्याला धरतीला संरक्षित करण्याकरीता नक्की प्रेरणा मिळेल सोबतच आपण जर या स्लोगनस् ला सोशल मिडीया साईट्वर शेयर कराल तर अन्य वाचकांना देखील आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रेरणा मिळेल.
धरतीला वाचवण्याकरीता आणि लोकांना जागरूक करण्याकरीता प्रत्येक वर्षी 22 एप्रील ला “वसुंधरा दिन” साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं.