How to write eaasy essay on mi pahilela circus in marathi
Answers
मी पाहिलेली सर्कस
आजच्या युगात सर्कस हे मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. विशेषेकरून छोट्या मुलांना अत्यंत आवडणारा मनोरंजन।
मी लहान असताना, गावात मोठी सर्कस “जेमीनी सर्कस” आली होती. आम्हा सर्व भावंडांना सर्कसीच भयंकर कुतुहल होतं. आमही सर्व भावंडानी सर्कसीला जाण्याकरिता बाबांकडे हट्ट धरला। बाबांनी सुट्टीच्या दिवशी सर्कसीला जाण्याच आश्वासन दिलं व टिकट देखील आणली। मग काय आम्ही त्या दिवसाची वाट बघू लागलो.
तो दिवस उगवला. सकाळी सर्व तयार झालो व आई बाबांना सोबत सर्कस बघायला गेलो. गावातील मैदानात खूप मोठा तंबू लागलेला होता. सभोवताल छोटे-छोटे इतर तंबू देखील होते. बहुधा ते सर्कसीतल्या कलाकारांना राहण्याकरीता बनवण्यात आले होते. सभोवताल प्राण्यांचे आरडाओरड, पक्ष्याची चिवचिवाहट ऐकायला येत होती। थोडासा घाणेरडा वास येत होता. पण आम्हाला सर्कस पाहायची होती. त्यामुळे या सर्व गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आणि सर्कसीच्या तंबूकडे गेलो. हा सर्वात मोठा तंबू होता व छान सज्जित केला होता. बाबांनी प्रथम श्रेणीची टिकटे आणलेली होती त्यामुळे आम्ही अगदी समोर होतो.
थोड्याच वेळात सर्कस सुरू झाली। सर्वांनी ताळ्या वाजवल्या। एका मागून एक अनेक खेळ दाखविण्यात आले। त्यात खास म्हणजे हत्तीच सायकल चालविणे, फुटबॉल खेळणं, क्रिकेट खेळणं, मुलीचं दोरावरून हातात एक काठी पकडून तोल सांभाळत एका टोकावरून दूसर्या टोकापर्यंत चालत जाणं. पक्षांच्या कसरती आणि सायकल चालवणं, वाघ, सिंह रिंगमास्टर च्या आदेशावरूण आग लागलेल्या रिंगणातून आर पार उडी घेणं इत्यादी. आणि मधून-मधून विदूषकांच्या मस्करी.
तीन तासांचा वेळ कसा गेला हे कळलंच नाही। आम्ही मुलं तर सारे खेळ तोंडात बोट घालून बघत होतो. आज एवढ्या वर्षांनंतर सुद्धा सर्कसीचे ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर जसच्या तसचं आहे.