how to write letter to younger brother in Marathi
Answers
Answered by
34
●●धाकट्या भावाला अभ्यासाचे महत्व समजावून सांगणारे पत्र:●●
२८,कृष्णविहार,
सी.बी.टी.,
नासिक-४२२ ००१.
दि: ८ डिसेंबर,२०१९.
प्रिय रमेश,
अनेक आशीर्वाद.
कालच मला आईचे पत्र मिळाले.पत्र वाचून खूप वाईट वाटले.तू अभ्यास करत नाहीस.खेळण्यातच वेळ घालवतोस. हे चांगले आहे का?
यावर्षी तू दहावीमध्ये आहेस.हे महत्वाचे वर्ष आहे.तू अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेस,तर पास कसा होशील?तुला चांगले गुण मिळाले तर, पुढे जाऊन चांगल्या कॉलेजमध्ये एडमिशन मिळवण्यासाठी समस्या येणार नाहीत.तू पास झाल्यावर आईबाबांना खूप आनंद होईल.
मी दिवाळीच्या सुट्टीत घरी येइन.त्यावेळी तुझा अभ्यास पाहीनच.मी सांगितलेले लक्षात ठेव.
तीर्थरूप आईबाबांना व आजीआजोबांना माझा नमस्कार.
तुझी ताई,
प्रीती.
Answered by
9
Answer:
I hope it's helpful for you
Attachments:
Similar questions