Hindi, asked by balasahebr79, 10 months ago

(इ-3) प्रसंग लेखन :
'माझ्या शाळेतील एक समारंभ' या विषयावर खालील
मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
'माझ्या शाळेतील एक समारंभ'
* शाळेचे नाव व ठिकाण * समारंभाचे नाव व वातावरण
* उपस्थित पाहुणे व मान्यवर
* तुमच्यावर झालेला परिणाम
* प्रत्यक्ष समारंभाचा घेतलेला अनुभव​

Answers

Answered by rajraaz85
14

Answer:

काल आमच्या शाळेत म्हणजे सरस्वती विद्यालय वडगाव सातारा येथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला. आजपर्यंत मी अनेक बक्षीस समारंभांना उपस्थित राहिलो होतो पण आजचा बक्षीस समारंभ हा काही वेगळाच होता. कारण आजचा बक्षीस समारंभ अशा मुलांसाठी होता ज्यांनी अतिशय टाकाऊ वस्तुंपासून काहीतरी नाविन्यपूर्ण अशा गोष्टींची निर्मिती केली होती. दैनंदिन जीवनात अशा भरपूर गोष्टी असतात ज्या आपण सहज फेकून देतो. आपण कधी विचारही करत नाही ती त्या वस्तूंपासून असे काहीतरी नाविन्यपूर्ण आपल्याला बनवता येईल. असे म्हणतात ना, "गरज ही शोधाची जननी असते." या गरीब कुटुंबातील मुलांना त्या प्रत्येक गोष्टीच काहीतरी महत्त्व असतं आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन या मुलांनी त्या फेकलेल्या वस्तूंपासून एवढ्या सुंदर नावीन्यपूर्ण वस्तू बनवल्या होत्या.

अश्या वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या केलेल्या कार्याचे कौतुक म्हणून बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातारा शहराचे महापौर श्री एन. के. अग्रवाल कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री अग्रवाल यांनी उपस्थित मुलांचे कौतुक करून त्यांना बक्षीस वितरण केले. मुलांचे कार्य आणि बक्षीस मिळाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर असणारा आनंद बघून मला खूप छान वाटले.

खरेतर त्यांच्याकडून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळाली. त्या मुलांशी बोलून आपणही काही तरी नवीन करू शकतो याची जाणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले आणि कार्यक्रमाचा शेवट मुख्याध्यापकांच्या आभार प्रदर्शनाने झाला. विद्यार्थ्यांचे अनुभव आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना कायमस्वरूपी लक्षात राहतील अशाच होत्या.

Similar questions