०२
इ. खालील वाक्यातील उद्देश विस्तार व विधेय विस्तार ओळखून लिहा.
१) शेजारचा धोंडू धपकन पडला.
२) नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात.
तुमच्या
शाळेत साजरा केलेल्या जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या कार्यकमाचा वृत्तांत मित्र / मैत्रिणीस पत्राद्वारे कळवा.
किंवा
तुमच्या शहरात स्वच्छता अभियान सुरु झाले त्यात विद्यार्थी कसे सहभागी होउ शकतील हे पटवून देउन त्यांना या
योजनेत सामावून घेण्याची विनंती नगराध्यक्षांना करणारे पत्र लिहा.
ब. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.
१) शाळा बंद पडल्या तर
२)माझा आवडता खेळ
विज्ञानाचे महत्त्व
Answers
Answer:
कधीकधी शाळांचा खूप कंटाळा येतो. सतत अभ्यास करावा लागतो. एकाच वर्ग खोलीत बसून राहावे लागते. हवे तेव्हा हवे ते करता येत नाही. गृहपाठ केला नाही तर शिक्षा होते. जरा चूक झाली की बाई आमच्या आई-बाबांना बोलावतात. परीक्षेत नापास झाल्यावर खूप दुःख होते. म्हणून वाटते की शाळा बंद झाल्या तर खूप बरे होईल हा सगळा त्रास वाचेल. मात्र शाळा बंद झाल्या तर खूप नुकसान होईल. शाळेमुळे मित्र मिळतात.
खूप गप्पा मारतात. खूप खेळता येते. आमच्या वर्गात पुस्तक वाचण्याचा तास असतो, तेव्हा आम्ही गोष्टीचे पुस्तक वाचतो. आमचे शिक्षक आम्हाला गोष्टी सांगतात. गाणी म्हणून दाखवतात. हा सगळा आनंद नष्ट होईल.
Explanation:
शाळा नसेल तर ज्ञान मिळणार नाही. मग डॉक्टर निर्माण होणार नाहीत. शास्त्रज्ञ निर्माण होणार नाही. त्यामुळे आपले खूप नुकसान होईल छे छे शाळा हवीच.
Answer:
इ. शेजारचा धोडु - उद्देश
पडला - विधेय्