India Languages, asked by 123sweety, 4 months ago

I need a Marathi essay on mhaja avadta praani...Please answer if you know else I'll report you...Best answer will be Rated and marked as Brailiest​

Attachments:

Answers

Answered by sturitika
1

Explana

मित्रानो आपल्या देशात खूप सारे पाळीव प्राणी पाळले जातात, त्यापैकी कुत्रा हा सर्वात जास्त पाळला जाणारा प्राणी आहे. आजच्या या लेखात मी तुम्हाला 2 माझा आवडता प्राणी कुत्रा या विषयावर निबंध मराठीत देत आहे. हे निबंध तुम्ही आपला शाळेचा होमवर्क म्हणून देखील वापरू शकता, तर करा सुरुवात..

1) माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra

माझा आवडता प्राणी कुत्रा आहे आणि आमच्या घरी सुद्धा आम्ही एक कुत्रा पाळला आहे, त्याचे नाव मोती आहे. मोती खूपच बहादुर आहे त्याचा रंग पांढरा आहे आणि मोठ मोठे कानासोबत वाकडी शेपटी आहे. त्याचे डोळे भुरे आहेत. मोती आमच्या कुटुंबाच्या सदस्या प्रमाणेच आहे. मला तो खूपच आवडतो. मी त्याच्या सोबत सकाळ संध्याकाळ खेळतो. मी त्याला रोज फिरवायला पण नेतो.

माझ्या 10 व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला मोती भेट म्हणून आणून दिला होता. मला आजवर मिळालेल्या भेट वस्तूंपैकी मोती हे सर्वात जास्त आवडते गिफ्ट आहे. त्याला आमच्यासोबत राहायला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मोतीची आणि माझी खूप घट्ट मैत्री आहे. मी त्याला बसायला सांगितले तर तो बसतो, उभे राहायला सांगितले तर उभा राहतो आणि माझ्यासोबत पळायला सांगितले तर पळतो देखील. थोडक्यात सांगायचे झाले तर मोती माझ्या सर्व आज्ञा पाळतो.

Answered by CutieDrishti
2

Explanation:

कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. त्याच्या अनेक प्रजाती प्रत्येक देशात आढळतात. कुत्र्याला इंग्लिशमध्ये डॉग असे म्हणतात. कुत्र्याला चार पाय, एक शेपटी, एक लांब असे तोंड, दोन कान आणि दोन डोळे असतात. कुत्रा हा भूचर सस्तन प्राणी आहे. कुत्र्याला शुद्ध भाषेत श्वान असेदेखील संबोधले जाते. कुत्र्याच्या आवाजाला भुंकणे असे म्हणतात. कुत्रा प्राचीन काळापासून मनुष्याच्या सहवासात असल्याच्या कथा आहेत. कुत्र्यामुळे मानवाची वन्य प्राण्यांपासून सुरक्षितता होते. कुत्र्याला अन्न दिल्याने तो त्याच घरी पाळीव बनून जातो.

कुत्रा हा त्याच्या इमानदारीमुळे प्रसिद्ध आहे. प्रत्येक घराच्या रक्षणाची जबाबदारी कुत्र्याला दिलेली असते. कुत्र्याची वास घेण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे श्वानपथक नावाने पोलिस यंत्रणा कुत्र्यांना गुन्हे तपासणीच्या मदतीसाठी वापरतात. अनेक आजारांतदेखील कुत्र्यांचा वापर होतो. त्यांचा फक्त सहवासच अनेक मानसिक रोग दूर करतो. अशा उपचार प्रक्रियेला “डॉग थेरपी” असे म्हणतात. त्यांच्या सहवासामुळे मानसिक ताण कमी येतो.

Similar questions