I need an essay for rainy season in marathi language
Answers
प्रस्तावना:
ज्या प्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये बदल होत असतो त्याच प्रमाणे निसर्गातही सुद्धा परिवर्तन होत असते. जसे मानवाच्या जीवनात सुख व दुःख येतात तसे निसर्ग सुद्धा कधी – कधी सुखद रूप प्रकट करतो तर कधी दुःखद रूप धारण करतो.
सुखानंतर थोडे दुःख आले कि वेदना होतात. उन्हाळ्यात खूप वेदना सहन करून आपण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच आमच्या भारत देशामध्ये सहा ऋतू हे एका मागून एक येत असतात आणि या निसर्गाची शोभा वाढवतात.
परंतु त्यातील तीन ऋतू हे प्रामुख्याने येतात. जसे कि उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तीन ऋतूंमध्ये पावसाळा हा सर्वात महत्वाचा आणि सर्वानाच लाडका ऋतू आहे.
पावसाची सुरुवात
पाऊस हा जून महिन्यापासून सुरु होतो आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. जुलै महिन्यात दक्षिण – पश्चिम वारे वाहू लागतात. तेव्हा पासून पावसाची सुरुवात होते. हिंदी महिन्यानुसार पाऊस हा आषाढ व श्रावण महिन्यापासून सुरु होतो.
पावसाच्या आधीची स्थिती
उन्हाळ्यात खूप उकाडा असतो. त्यामुळे सर्व माणसे उकडत्या उन्हामुळे खूप त्रस्त झालेली असतात. संपूर्ण धरती तव्यासारखी तापलेली असते.
तसेच उन्हाळयात पाण्याचे सर्व स्रोत सुखतात. त्यामुळे पशु – पक्षी पाण्याच्या शोधात असतात. सगळी झाडे – झुडपे आणि वनस्पती उन्हामुळे सुकून जातात.
पावसामुळे निसर्गात झालेले बदल
पावसाळ्यामध्ये निसर्गाचे सौंदर्य फार बदलून जाते. पहिल्या पावसात मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो. पावसाचे पाणी झाडांवर पडल्याने सर्व झाडे हिरवीगार दिसू लागतात.
सर्व झाडांना नवीन जीवनदान मिळते. झाडांना नवीन पालवी येते. तसेच झाडे फुलांनी बहरून जातात. उन्हामुळे तापलेल्या धरतीमध्ये आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो.
पावसाच्या पाण्यामुळे पाण्याचे सर्व स्रोत जलयुक्त होऊन जातात. जसे कि नदी – नाले, समुद्र, तलाव, विहिरी इ. तुडुंब भरून वाहू लागतात. सगळीकडे हिरवळ पसरते.
पाऊस शेतीसाठी उपयुक्त
पावसाळी हंगाम हा शेतीसाठी खूप उपयुक्त असतो. कारण शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पाऊस हा जमिनीला ओलसर करतो.
भारत देशातीळ गावातील शेतकरी हे पहिला पाऊस पडताच शेत नांगरणी करतात आणि त्यामध्ये बी – बियाणे पेरतात. म्हणून सर्व शेतकरी जून महिना सुरु होताच आकाशाकडे डोळे लावून बसतात.
पावसाळ्यातील उत्सव
आपल्या भारत देशात श्रावण महिन्यापासून सणांची सुरुवात होते. म्हणून श्रावण महिना हा सर्वात पवित्र किंवा शुभ मनाला जातो. असे म्हटले जाते कि, पाऊस पडताच एका मागून एक सण हे येतात. जसे कि रक्षाबंधन, १५ ऑगस्ट, गणेश चतुर्थी इ.
पावसाळ्यात इंद्रधनुष्य
जेव्हा आकाश साफ, सुंदर आणि हलके निळे दिसू लागते तेव्हा सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो. त्यावेळी संपूर्ण वातावरण स्वच्छ आणि सुंदर दिसते.
हा लहान – मोठ्यानं मोहित करणारा इंद्रधनुष्य जणू काही आपल्या डोळ्यांना मिळणार निसर्गाचा एक नायबचं भेट आहे. लहान मुलांना इंद्रधनुष्य पाहताना खूप मजा वाटते.
पावसाचे तांडव
पाऊस हा कधी – कधी रिमझिम पडतो. तर कधी – कधी हा धो – धो कोसळतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. वाहने बंद पडतात आणि शाळांना सुद्धा सुट्टी मिळते.
जास्त प्रमाणात पाऊस पडू लागला कि, पूर येतो. दरड आणि डोंगर कोसळतात. या सर्वांमुळे जीवित हानी आणि वित्त हानी होते. अखंड पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते.
निष्कर्ष:
पावसाळा हा ऋतू सर्वाना समाधान देतो तसेच हा ऋतू सर्वांचा आवडता ऋतू आहे. या पावसाळ्या ऋतूंवर अनेक कवींनी आपल्या कवितांमध्ये अत्यंत छान प्रकारे पावसाळा या ऋतूचे वर्णन केले आहे.
Answer:
it isthe rain season there is water all around
in rainy season there is the changes of flood
in rainy season the food get spoiled faster
it claimet is. cold
no .
Explanation:
please follow me please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please