i need an essay for summer season in marathi language
Answers
Answer:
बऱ्याच लोकांना उन्हाळा ऋतू आवडत नाही.उन्हाळ्यात लोकांना फार त्रास होतो.बाहेर उन्हाचे चटके लागत असल्यामुळे,घरातून बाहेर निघणे कठीण होऊन जाते.
पण, तरीही मला मात्र उन्हाळा ऋतू खूप आवडतो.वार्षिक परीक्षा संपल्यावर उन्हाळ्याची सुट्टी मिळते.त्यावेळी आपल्याला गृहपाठ किंवा अभ्यास करायला लागत नाही.पाहिजे तितके खेळायला मिळते.मित्रांबरोबर फिरायला, गप्पा मारायला भरपूर वेळ मिळतो.
सुट्टीत मी माझ्या गावी जाते.तिथे खूप मजा करते.कुठेही भटकायला मिळते.कशाचीही भीती नसते.
उन्हाळ्यात मी माझ्या भावंडांबरोबर रानात भटकायला जाते.तिथे आम्ही आंबे,फणस,काजू खातो.झाडावर चढून फळे खायची मजाच वेगळी असते. कधीकधी आम्ही नदीत पोहायला जातो.
उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत कुठे न कुठेतरी फिरायला जातातच.उन्हाळ्यात खूप मजा,धमाल करायला मिळते.म्हणूनच,उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे.
Explanation: