इ) पुढील वाक्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
२) हाल होणे
Answers
Answered by
0
Answer:
हाल होणे -अर्थ- खूप त्रास होणे किंवा यातना होणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. अजय गावाला जात असताना बस न आल्यामुळे त्यांचे खूप हाल झाले.
२. शेखर चे आई वडील गरीब असल्यामुळे शेखरच्या शिक्षणासाठी त्यांचे खूप हाल झाले.
३. नवऱ्या मुलाकडच्यांच्या वाढत्या मागणीमुळे सामान्य कुटुंबातील आई वडिलांचे मुलीच्या लग्नासाठीही खूप हाल होत असतात.
४. ज्यावेळी गटातील सर्व व्यक्ती आपला सहभाग देत नसतील त्यावेळेस गटाच्या प्रमुखाचे एखादे कार्य करत असताना खूप हाल होतात.
५. अचानक सर्व बाजूने संकट आल्याने ते संकट सोडत असताना विजय चे खूप हाल झाले.
वरील विधानांवरून असे लक्षात येते की ज्या वेळेस एखादी गोष्ट करत असताना व्यक्तीला खूप त्रास होतो त्याला हाल होणे असे म्हणतात.
Similar questions