Science, asked by pagar7856, 15 days ago

i) पोषण कशाला म्हणतात?​

Answers

Answered by Pratikghavat
31

Explanation:

पोषण : एककोशिकीय (एकाच पेशीच्या बनलेल्या) जीवांपासून ते जटिल अशा स्तनी प्राण्यांपर्यंतच्या सर्व प्राण्यांना व वनस्पतींना त्यांच्या क्रियाशील जीवनासाठी आणि यशस्वी प्रजोत्पादनासाठी वा पुनरुत्पादनासाठी काही खाद्य पदार्थ किमान स्वरूपात व प्रमाणात लागतात. हे पदार्थ काय आहेत? त्यांचे कार्य असे होते? या पदार्थांचे प्रमाण कमी वा जास्त झाल्यास काय परिणाम होतात? पोटात गेल्यावर त्यांचे काय होते? इत्यादी तत्संबंधी प्रश्नांशी पोषण निगडित आहे. ‘अत्राचे शास्त्र व त्यातील पोषक घटक आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध’ अशी पोषणाची व्याख्या करता येईल. ⇨जीवरसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि एंझाइमविज्ञान (सजीव कोशिकांमध्ये तयार होणाऱ्या व रासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिन संयुगांचे विज्ञान) ह्या शास्त्रांशी पोषणाचा संबंध येतो. पोषण आणि ही शास्त्रे एकमेकांत इतकी गुंफलेली आहेत की, काही वेळा त्यांच्यातील फरक दाखविणे शक्य होत नाही. विविध प्रकारच्या प्रत्येक सजीवाच्या पुढील दोन पोषणविषयक गरजा असतात : (१) ज्यांच्यापासून ऊर्जा उत्पत्र होते असे पदार्थ अन्न म्हणून खाणे व (२) ज्या पदार्थांचे सजीवांच्या क्रियात्मक वा संरचनात्मक गरजा भागविणे हे प्राथमिक कार्य आहे असे पदार्थ. काही पदार्थ दोन्ही प्रकारच्या गरजा भागवू शकतात. एका जातीतील जीवांना लागणाऱ्या पोषणविषयक पदार्थांचे प्रमाण दुसऱ्या जातीतील जीवांच्या बाबतीत जास्त असेल, कमी असेल वा निराळे असेल. काही जीव काही वेळा हे पदार्थ इतर पदार्थांपासून तयार करू शकतात. त्यामुळे एका जातीबद्दलच्या पोषणविषयक ज्ञानावरून दुसऱ्या जातीच्या जीवासंबंधीचे पोषणविषयक अंदाज बांधणे कठीण जाते.

Answered by soniatiwari214
0

उत्तर:

पोषण म्हणून ओळखल्या जाणार्‍या बायोकेमिकल आणि फिजियोलॉजिकल प्रक्रियेद्वारे जीव आपले जीवन टिकवण्यासाठी अन्नाचा वापर करतो.

स्पष्टीकरण:

  • हे सजीवांना पोषण देते जे ऊर्जा आणि रासायनिक बिल्डिंग ब्लॉक्स तयार करण्यासाठी प्रक्रिया केली जाऊ शकते. अपुऱ्या आहारामुळे कुपोषण होते.
  • पोषण ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे जीव त्यांच्या शरीरात अन्न घेतात आणि त्यातील पोषक घटक वापरतात.
  • आरोग्य आणि विकासाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पोषण.
  • मजबूत रोगप्रतिकार प्रणाली, सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसूती, गैर-संसर्गजन्य रोगांचा कमी धोका (मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसह), आणि दीर्घ आयुष्य हे सर्व चांगल्या पोषणाशी संबंधित आहेत.

जे लोक चांगले पोषण करतात ते अधिक उत्पादनक्षम असतात आणि भूक आणि गरिबीचे चक्र हळूहळू संपवण्याचे दरवाजे उघडू शकतात.

#SPJ2

Similar questions