Math, asked by padawaledhananajay, 7 months ago

(इ) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.​

Answers

Answered by Pranitasurwase
10

Step-by-step explanation:

i hope it's very useful to you

Attachments:
Answered by rajraaz85
2

Answer:

महाराष्ट्रातील लोक संगीताचा उल्लेख केला म्हणजे विठ्ठल उमप हे नाव येणार नाही असे कधीच होत नाही. लोकसंगीताला मना मनापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम विठ्ठल उमप यांनी केले. विठ्ठल उमप हे अतिशय उच्च दर्जाचे लोक गीतकार, शाहीर आणि थोर समाज सुधारक होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील अनेक वाईट रूढी आणि परंपरा विरुद्ध त्यांनी आवाज उठवला व आपल्या गाण्याच्या माध्यमातून समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा वारसा घेऊन त्याने अनेक गितांची निर्मिती केली व लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांचे गीते शायरी आणि पथनाट्य लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. अनेक गंभीर विषय अगदी सहजपणे ते आपल्या गाण्यांच्या किंवा शायरीच्या माध्यमातून सादर करत असत. त्यांची लोकप्रियता वाढल्यानंतर त्यांनी अनेक अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.

महाराष्ट्र राज्याच्या तसेच अनेक विद्यापीठांच्या द्वारा चालवण्यात येणाऱ्या लोककला क्षेत्राला त्यांनी मोलाचे सहकार्य दिले. त्यांचे कार्य व त्यांचे शायरी ची लोकप्रियता मनामनांत पोहोचल्यामुळे त्यांना अनेक बक्षिसे मिळाली.

Similar questions