History, asked by pandurangingale922, 6 months ago

(४) इ.स.१९७४ साली भारताने
ठिकाणी अणुचाचणी केली.
(अ) श्रीहरीकोटा
(ब) धुंबा
(क) पोखरण
(ड) जैतापूर
पदील विधाने चक की बरोबर ते सकारण स्पष्ट​

Answers

Answered by riti4227
1

Explanation:

१८ मे १९७४ रोजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी राजस्थानमधील पोखरणच्या फील्ड फायरिंग रेंजवर मोठा स्फोट झाला. जमीन कापायला लागली. सगळीकडे हाहाकार माजला होता. घरांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या आणि आकाशात वाळूचा घेर निर्माण झाला होता. हा स्फोट होता भारताच्या पहिल्या अणुचाचणीचा. १९७४ च्या चाचण्यांसाठी ‘हसणारा बुद्ध’ असे सांकेतिक नाव दिले गेले होते; तर १९९८ च्या चाचण्यांना ‘बुद्ध हसला’ असे नाव दिले गेले होते. त्या यशाचे वर्णनही ‘आणि बुद्ध हसला’ असेच करण्यात आले होते.

भारताच्या पहिल्या अणुचाचणीची माहिती त्या काळी प्रचंड गोपनीय ठेवण्यात आली होती. त्यापूर्वी लोकांना घटनेविषयी काहीच कल्पना नव्हती. लष्कराचे हेलिकॉप्टर, वाहन गावात यायचे. अधिकारी, वैज्ञानिक हे डॉक्टर बनून लोकांमध्ये मिसळून जायचे. परंतु ते नेमके कशासाठी आले याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. ही मोहीम इतकी गोपनीय होती की, तत्कालीन संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनासुद्धा याची कल्पना नव्हती.तत्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंह यांनासुद्धा चाचणीच्या ४८ तासच आधी याची माहिती देण्यात आली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मात्र या संपूर्ण प्रकल्पावर आधीपासूनच बारीक लक्ष होते. चाचणीच्या दिवशी बुद्धपौर्णिमा होती. त्यामुळे चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्यांना याची माहिती ‘बुद्ध हसले’ अशा कोडवर्डच्या माध्यमातून देण्यात आली. चाचणीसाठीच्या अणुबॉम्बला १९७ मीटर खोल रेतीत गाडून ठेवण्यात आले होते. यासाठी ७५ वैज्ञानिकांचा चमू कार्यरत होता. परंतु याविषयी कोणतीच माहिती बाहेर जात नव्हती. अणुचाचणीमुळे भारताची मान जगभरात उंचावली होती.

घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले लोहारकी या गावचे नागरिक भैराराम विश्नोई यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या दिवशी सकाळीच लष्कराने लोहारकी परिसरात अलर्ट घोषित करून टाकला होता आणि सर्व नागरिकांना घरातच राहण्याची ताकीद दिली होती. मात्र, भैराराम त्यांच्या ताकिदीला न जुमानता गायी चारायला घराबाहेर पडले. लोहारकीपासून थोड्या अंतरावर जाताच एक मोठा स्फोट झाला आणि ते जमिनीवर आदळले. दरम्यान, बाजूच्या विहिरीतून मोठमोठे दगड हवेत फेकले जात असल्याचे आणि वाळूने आकाश घेरल्याचे त्यांनी बघितले. बर्‍याच वेळपर्यंत पायाखालच्या जमिनीत कंप होत होता. भैराराम कसेबसे गावात पोहोचले. इकडे गावातही हाहाकार माजला होता. अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु कोणालाच कळत नव्हते की नेमके काय घडत आहे. दरम्यान, सायंकाळी रेडिओवर ही घटना म्हणजे भारताने घडवून आणलेली पहिली अणुचाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तेव्हा गावकर्‍यांना हे कळले.

‘..आणि बुद्ध हसला’..१८ मे १९७४ ला इंदिरा गांधींना स्वत: डॉ. राजा रमण्णा यांनी पोखरणजवळील एका खेड्यातून फोनवरून ही माहिती दिली आणि भारताच्या तत्कालिन पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य उमटले. ताबडतोब जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या पंतप्रधानांना फॅक्‍स पाठविण्यात आले. ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता..”भारताची पहिली अणुचाचणी यशस्वी !’ १९४० च्या दशकात डॉ. होमी भाभांनी पाहिलेले “शांततेसाठी अणुकार्यक्रम’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यातील एक महत्त्वाचा टप्पा या स्फोटाद्वारे पार पडला होता. काही दिवसांनी पंतप्रधान इंदिरा गांधीनी पोखरण, लोहारकीला प्रत्यक्ष भेट देऊन गावकर्‍यांना सर्व प्रकारची मदत देण्याचा विश्वास दिला. त्यापूर्वी लोकांना घटनेविषयी काहीच कल्पना नव्हती. लष्कराचे हेलिकॉप्टर, वाहन गावात यायचे. अधिकारी, वैज्ञानिक हे डॉक्टर बनून लोकांमध्ये मिसळून जायचे. परंतु ते नेमके कशासाठी आले याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता.

भारताने त्याचा अणुसंबंधी कार्यक्रम १९४४ मध्येच डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेच्या अंतर्गत चालू केला होता. भारत-पाकिस्तानच्या १९७१युद्धापर्यंत अण्विक शस्त्र कार्यक्रमास भारताने अग्रक्रम दिला नव्हता. डिसेंबर १९७१ मध्ये अमेरिकेच्या ३७वे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारतावर दबाव आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात विमानवाहू नौका पाठवली. रशियानेही भारताच्या मदतीसाठी दोन युद्धनौका पाठवल्या आणि एकप्रकारे अमेरिकेला भारताविरूद्ध अण्वस्त्रे वापरण्यापासून थांबवले. याप्रकारानंतर भारताला अण्वस्त्रे जवळ असणे महत्वाचे झाले. ७ सप्टेंबर १९७२ रोजी इंदिरा गांधींनी भाभा अणुसंशोधन केंद्रास अणूयंत्रे बनवण्यास आणि चाचण्या करण्यास मान्यता दिली. १८ मे १९७४ साली पहिली चाचणी घेण्यात आली, पण ती फारच सामान्य अवस्थेतील होती आणि त्यानंतरच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी अणू संशोधनात आजतागायत देदीप्यमान प्रगती केली आणि त्याचा प्रत्यय १३ मे १९९८ या बुद्ध पौर्णिमेला आला. या बॉंबचा आकार अमेरिकेच्या ’फॅटमॅन’ बॉंब सदृश होता आणि त्यासाठी ६ किलो प्लुटोनिअम लागले. अणुचाचणीसाठी वापरलेल्या बॉंबचा व्यास १.२५ मीटर तर वजन १४००किलो होते. स्फोटातून ८ किलोटन टीएनटी इतकी उर्जा निर्माण झाली. नागासाकीवरती टाकण्यात आलेल्या फॅटमॅनमधून २० किलोटन उर्जा निर्माण झाली होती, यावरून या स्फोटाची तीव्रता लक्षात येते.

Similar questions