इंटरनेट आणि आम्ही विद्याथी मराठी भाषण
Answers
Answered by
1
कोविड-१९ साथ आणि त्यानंतर लावण्यात आलेला लॉकडाउन यांमुळे देशभरातील शाळा बंद झाल्या आहेत. परिणामी, भारतातील शाळा व्यवस्था पारंपरिक वर्गांमधून डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर स्थलांतरित झाली आहे.ऑनलाइन शिक्षणाच्या दिशेने घाईत उचलल्या गेलेल्या या अनियोजित पावलामुळे ‘डिजिटल उपलब्धता’ नसलेला एक मोठा वर्ग या आभासी वर्गांबाहेर फेकला गेला आहे.ऑनलाइन शिक्षण मुठभर सुदैवी मुलांनाच मिळत आहे, कारण, भारतातील केवळ २४ टक्के कुटुंबांकडे स्मार्टफोन्स आहेत. ५ ते १८ या वयोगटातील मुले असलेल्या केवळ ११.५ टक्के घरांमध्ये कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन आहे. मात्र, या सर्वांचे आयुष्य एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून घरापुरते संकुचित झाले आहे. त्यांचे म्हणणे काय आहे? सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या ५ ते १८ या वयोगटातील मुलांचा अनुभव जाणून घेण्यासाठी १५ मे ते १७ मे या काळात एक सर्वेक्षण घेण्यात आले. ४० प्रश्नांची एक प्रश्नावली व्हॉट्सअॅप व ईमेलद्वारे पाठवण्यात आली. १३ राज्यांतील १५५ विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आसाम, बिहार, दिल्ली, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हे सर्वेक्षण रॅण्डम पद्धतीने घेण्यात आले.
Similar questions