(४) इंटरनेट / संदर्भपुस्तके / मासिके यांद्वारे भारताला तोंड दयाव्या लागणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची माहिती मिळवा.
मिळालेली माहिती चित्रे/ आकडेवारीच्या सारण्या इत्यादींच्या आधारे लिहा.
(प्रकरण ४)
Answers
विकसित राष्ट्र असो वा विकसनशील राष्ट्र असो; त्या राष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा त्या राष्ट्राचे अपरिमित नुकसान होते. त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. पृथ्वीतलावरील वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार तसेच वातावरमीय बदलांनुसार महापूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळ, दरडी कोसळणे इत्यादी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती त्या त्या प्रदेशांमध्ये येत असतात. भारत हा जगातील सर्वात जास्त नैसर्गिक आपत्ती येणारा देश मानला जातो. विकसित राष्ट्र असो वा विकसनशील राष्ट्र असो; त्या राष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा त्या राष्ट्राचे अपरिमित नुकसान होते. त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. पृथ्वीतलावरील वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार तसेच वातावरमीय बदलांनुसार महापूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळ, दरडी कोसळणे इत्यादी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती त्या त्या प्रदेशांमध्ये येत असतात. भारत हा जगातील सर्वात जास्त नैसर्गिक आपत्ती येणारा देश मानला जातो. भौगोलिक स्थिती, हवामान तसेच सामाजिक व आर्थिक परिस्थिती यामुळे भारत नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीप्रवण देश आहे. एकूण लोकसंख्येच्या साधारणतः सहा टक्के लोकसंख्या ही दरवर्षी वेगवेगळ्या आपत्तींनी प्रभावित होते. आपत्तींमुळे निश्चितच अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. जरी नुकसान झाले तरीही अपु-या साधनांनिशी छोटे-मोठे उद्योग आपला व्यवसाय सुरू ठेवतात किंवा सुरू करू शकतात. परंतु, वास्तवात आपत्तीचा सर्वात मोठा आघात अशा लोकांवर होतो, ज्यांचा देशाच्या अर्थकारणात नगण्य सहभाग असतो. उदा. छोटे दुकानदार, मच्छिमार, फळविक्रेते, लहान लहान कारगीर अशांचे रोजगार अशा आपत्तींमध्ये बुडतातच, पण त्यांची तुटपुंजी बचतसुध्दा संपून जाते.
इंटरनेट संदर्भ पुस्तके मासिक की याद्वारे भारताला तोंड द्याव्या लागणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची माहिती द्या
Explanation: