Biology, asked by taniya5561, 2 days ago

११) इंटरनेटच्या आधारे २०११ ते २०१८ या कालावधीतील भारतातील सरासरी आयुर्मान दराविषयी आकडेवारी गोळा
करा. सरासरी आयुर्मानावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती मिळवा व मिळालेली माहिती वर्गात सादर करा.
(प्रकरण ६)​

Answers

Answered by rohit12353
3

Answer:

सरासरी आयुर्मान

सरासरी आयुर्मान : कोणताही लोकसमूह अनेक व्यक्तींचा समूह असतो. त्या समूहातील एखादी व्यक्ती किती वर्षे जगेल, हे जरी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सांगता येणे शक्य नसले; तरी त्या समूहाच्या मृत्युमानात बदल झाला नाही, तर त्यातील व्यक्ती सरासरी किती वर्षे जगण्याची शक्यता आहे याचा निष्कर्ष काढता येतो. अशा निष्कर्षास त्या समूहातील व्यक्तीचे सरासरी आयुर्मान (अ‍ॅव्हरेज एक्स्पेक्टेशन ऑफ लाइफ) असे म्हणतात. हे आयुर्मान कोणत्याही विशिष्ट वयाच्या व्यक्तींच्या बाबतीत काढता येते व साहजिकच निरनिराळ्या वयाच्या व्यक्तींच्या बाबतीत ते निरनिराळे असते. हे आयुर्मान सरासरी असल्यामुळे त्यावरून त्या वयाची विशिष्ट व्यक्ती नेमकी किती वर्ष जगेल, हे निश्चितपणे समजू शकणार नाही. प्रत्येक वयोगटाचे मृत्युमान त्या गटाच्या सरासरी आयुर्मानात प्रतिबिंबित झालेले असते; परंतु या मृत्युमानात भविष्यकाळात होणारे बदल आयुर्मानाच्या आकड्यात आढळून येत नाहीत.

आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण मानतात. आरोग्यविषयक सुखसोयी वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि अधिक जीवनसत्त्वे असलेला मूबलक आहार मिळू लागला, की आयुर्मान वाढू लागते. पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या दोन शतकांत सरासरी आयुर्मानात दुपटीहुनही अधिक वाढ झाल्याचे दिसून येते. अठराव्या शतकात स्वीडनमध्ये पुरुषांचे सरासरी आयुर्मान ३३.२ वर्षे होते, तेच १९४६-५० या काळात ६९ वर्षे झाले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये १७८० च्या सुमारास आयुर्मान ३५.५ वर्षे होते, तेच १९६२ मध्ये पुरुषांचे ६६.८ वर्षे व स्त्रियांचे ७३.४ वर्षे झाले. ते २००० साली ८२ पर्यंत जाईल, असे अर्व्हिग फिशर यांचे अनुमान आहे. इतर प्रगत राष्ट्रांमधील सरासरी आयुर्मानाचे आकडे असेच आहेत. जपान (१९६०) व ग्रेट ब्रिटन (१९६०-६२) या देशांत ते अनुक्रमे पुरुषांसाठी ६६.२ व ६८.० वर्षे, तर स्त्रियांसाठी अनुक्रमे ७१.२ व ७४.० वर्षे एवढे होते. हॉलंड (पुरुष : ७०.६ ; स्त्री : ७२.९ वर्षे : १९५०-५२) आणि नॉर्वे (पुरुष : ६९.२; स्त्री : ७२.६ वर्षे : १९४६ - ५०) ह्या देशांत सरासरी आयुर्मानाचे असे प्रमाण आहे. अर्धविकसित देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे, परंतु आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे.

Answered by pragnyadas
2

Answer:

ohhh acha

ye sam na kabhi bi kisi ko v apna id pa ss.word de deta hai

Explanation:

Similar questions