CBSE BOARD X, asked by kp833121, 2 months ago

इंटरनेटच्या साह्याने भारताच्या भूकंप प्रवण क्षेत्राचा नकाशा पहा भारताचा राजकीय नकाशा घ्या आणि त्या नकाशावर भूकंपप्रवण क्षेत्र काढा आणि स्पष्टपणे वेगवेगळ्या क्षेत्रांची मांडणी करा

Answers

Answered by py5024131
46

Answer:

भारतातील किमान ३८ शहरे अतिशय धोकादायक अशा भूकंपप्रवण क्षेत्रात असून, भारतीय उपखंडातील सुमारे ६० टक्केभूभाग भूकंप येण्यासारख्या स्थितीत आहे. दिल्ली मेट्रोसारखे अपवाद वगळले, तर घाईत आणि अनियोजित पद्धतीने उभारल्या गेलेल्या भारतातील शहरांना भूकंपाने मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.

भारतातील ३८ शहरे सौम्य ते तीव्र अशा भूकंपप्रवण क्षेत्रात येतात, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या शहरांपैकी बहुतांश बांधकामे भूकंपरोधक नाहीत. त्यामुळे भूकंप झाल्यास यापैकी कुठल्याही शहरात अनर्थ ओढवू शकतो, असे संयुक्त राष्ट्रसंघाने २००६ साली गृहमंत्रालयासाठी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भूकंपामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोने १९६२ साली ‘भूकंपरोधक डिझाइनसाठी भारतीय मानकांचे निकष’ प्रकाशित केले होते व त्यात सगळ्यात अलीकडे २००५ साली सुधारणा करण्यात आली.

Similar questions