I want a essay on my grandmother in Marathi.
Answers
Answered by
3
hey user here is ur essay on our granny/aaji.....
संध्याकाळी देवापुढे दिवा लावून माझी आजी आपली सुरेल आवाजात सांज आरती करते. उदबत्तीचा सुवास घरभर पसरतो आणि तुपाच्या दिव्यातील वात मंद प्रकाशात फडफडत असते. सगळ्या देवांच्या मुखावर तो मंद प्रकाश पसरतो आणि देवांच्या सात्विक मूर्तींबरोबर माझी आजी पण इतकी सात्विक दिसते की तिच्या कडे बघतच राहावे असे वाटते. माझी आजी म्हणजे माझ्या बाबांची आई माझ्या मनातला एक सुंदर ठेवा आहे. ती माझी हक्काची दौलत आहे ज्याच्यावर माझा आणि फक्त माझा हक्क आहे. माझी आजी माझे सर्वस्व आहे. ती माझी मैत्रीण आहे, माझी शिक्षक आहे, माझी मोठी आई आहे आणि माझे बाबा पण आहे. तिचे आणि माझे एक सुंदर विश्व आहे.माझी आजी खूप रुबाबदार दिसते. ती उंच, गोरीपान आणि धारदार नाकाची आहे. ह्या वयात पण तिला एकही सुरकुती नाही आहे. साधी स्वच्छ सुती किंवा रेशमी साडी आणि ब्लाउज, केसांची वेणी किंवा अंबाडा आणि डोळ्याला चष्मा असे तिचे रूप आहे. त्यामुळे ती खूप करारी वाटते. ती ठाम मतांची आहे. तिला नीटनेटके रहायला आवडते, आणि आम्हालाही ती तसेच रहायला लावते. ती मोजकेच दागिने घालते. पण त्यात तिचा चोखंदळपणा दिसून येतो. ती कधी मोत्याचे तर कधी सोन्याचे दागिने घालते. ती जे काही सांगते ते आमच्या भल्यासाठीच असते हे आम्हाला नक्की माहित आहे म्हणून आम्ही कोणीही तिचा शब्द मोडीत नाही.आजी जरी करारी असली तरी मनातून अत्यंत प्रेमळ आहे. तिचे प्रेम ज्यांना लाभले ते खूप भाग्यवान! आम्ही नातवंड आजीचे खूप लाडके आहोत. आमच्यासाठी ती काहीही करायला तयार असते. ती आमच्याबरोबर पत्ते खेळते, चेस ,साप शिडी, व्यापार इत्यादी खेळ आम्हाला सुट्टी लागली की खेळते. त्या खेळांमध्येही तीच जिंकते.मला तर माझी आजी ही एक आदर्श व्यक्ती वाटते. ज्या मुलांना आजी नसते त्यांची मला खूप दया येते. माझे मित्र मैत्रिणी तर तिला पळवून नेण्याच्या गोष्टी करतात. मग ती अगदी गोड हसते. आणि त्यांना पण खाऊ देते.
अशी आहे माझी गोड गोड आजी! ............hope it may help u.......#MB

Similar questions