India Languages, asked by alkast, 1 year ago

i want an essay in marathi language on my grandfather

Answers

Answered by fistshelter
45

Answer:आजी आजोबा हे एक हळुवार नाते आहे.आजी आजोबांच्या मायेच्या स्पर्शा इतकेच मऊ ,कोमल आहे.प्रत्येकाच्या अगदी जवळचे,हवेहवेसे वाटणारे असे हे नाते असते.

माझे आजोबा म्हणजे सदैव प्रसन्न अशी मूर्ती;ते नेहमी आनंदी असतात. त्यांना नीटनेटकेपणा व स्वच्छता यांची भारी आवड आहे.हा गुण तर सगळयांनी त्यांच्याकडून घ्यावा असा आहे. स्वातंत्र्याचा सगळा इतिहास मला आजोबांनी सांगितला आहे. ते मला छान छान गोष्टी सांगतात. मला श्लोक शिकवतात.

आजोबा मला बाहेर फिरायला घेऊन जातात. माझ्या सोबत क्रिकेट सुद्धा खेळतात. खरचं आजोबा असणे ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे.

Explanation:

Answered by Hansika4871
36

माझ्या आजोबांचे नाव "घनश्याम पाटील" आहे. ह्या महिन्यातच त्यांची सत्तरी झाली. आम्ही सगळ्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. निवृत्त असल्यामुळे आजोबा घरीच असतात. आपला वेळ मार्गी लावण्यासाठी ते टीव्ही वर बातम्या बघत असतात. टीव्ही बघणे त्यांचा आवडता छंद.

फावल्या वेळात आजोबा वाचनालयात जातात व आपल्या मित्रांशी गप्पा मारतात. कधी कधी ते गार्डन मध्ये जातात व सावरकर क्लब मध्ये कॅरम, चेस असे खेळ खेळतात. माझे लाड पूर्ण करतात!

असे माझे आजोबा मला खूप आवडतात.

Similar questions