I want essay on " Mobile che dushparinaam" in Marathi.
Answers
Answered by
1
मोबाइलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजे रेडिएशनचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. या दुष्परिणामाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ फार चिंतित आहेत. दुष्परिणामुळे शारीरिक होणारी झीज यावर शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. अनेक रिसर्च प्रोजेक्ट यावर कसून संशोधन करीत आहेत व त्याची माहिती जगासमोर ठेवत आहेत. धोक्याच्या इशार्याची घंटा वाजवत आहेत. पर्यावरणावरही याचा धोकादायक परिणाम होतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे विश्व उष्णतापमान झपाट्याने वाढत आहे. या रासायनिक अशुद्धतेमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रात त्याचे धोकादायक परिणाम येण्यास सुरुवात केव्हाच झाली आहे.
सेल फोनचे धोके : तुम्ही सिगारेट, तंबाखूची जाहिरात पाहिली का? त्यावर स्पष्ट लिहिले आहे की, ‘सिगारेट, तंबाखूमुळे कॅन्सर होतो.’ तशीच आता मोबाइल वापरणार्यांसाठी शास्त्रज्ञांना सूचना द्यावी लागत आहे. फिनलॅँड रेडिएशन अॅँड न्यूक्लियर सेफ्टी अथोरिटी यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यांच्या अहवालानुसार मानवी शरीरातील पेशी सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्या आकसून जात आहेत. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे पेशीमधील प्रोटीन वाढवते व ते पेशी खराबीचे एक लक्षण आहे. मोबाइल फोन कानाजवळ ठेवल्यामुळे त्यातून निघणार्या रेडिओ लहरी डोक्यात शिरतात. त्यामुळे त्याभागातील उष्णतापमान वाढते व लोकल ब्लडफ्लो वाढतो. त्यामुळे अॅल्बुनिन रक्तवाहिनीतून निघून मेंदू पेशीत व पेशीजलात येतो. मोटोरोला कंपनीने सांगितले की रेडिएशन जास्त प्रमाणात की पॅड व माउथ पीसमधून पाझरत असते. हेच रेडिएशन मेंदूपेशींमध्ये जबरदस्तीने घुसतात. डोळे, कान या पेशीत शिरतात. डोळे व कान यातील पेशी सूक्ष्म व नाजूकपेशी असतात. मायक्रोव्हेवना अत्यंत संवेदनशील असतात. जी मंडळी मोबाइल कमरेच्या बेल्टला लावतात. त्यांच्या मोबाइलमधून उत्सर्जक किरणे लिव्हर, मूत्रपिंडाकडे जातात. जेव्हा मोबाइल वापरात नसतो म्हणजे तुम्ही बोलत नसताना तो शरीराच्या जवळ ठेवू नका. त्याला शरीरावर चढवू नका. छातीजवळ, खिशात किंवा पॅँटच्या खिशात अगर बेल्टवर नको. त्याला दूर ठेवा. कारण, किरण उत्सर्जनामुळे अवयव खराब होतात. मोबाइल जास्त वापरणार्यांना संशोधकांनी सांगितले आहे की, ग्लायोमाचा धोका, श्रवण पेशीचा धोका आहे. ज्या कानाला मोबाइल ठेवता त्या बाजूला ट्यूमर होण्याचा धोका खूप आहे. रोज एकतास किंवा सतत मोबाइल वापरल्याने ट्यूमर होण्याचा धोका दहा वर्षांत होऊ शकतो.

Similar questions