Hindi, asked by ganitha1034, 1 year ago

I want Marathi essay maza avadata pustak

Answers

Answered by Shaizakincsem
234
वाचन पुस्तके म्हणजे माझे मनोरंजन पुस्तके माझे कधीही-पडणारा मित्र नाहीत जेव्हा मी स्वतःबरोबर सुसंगत असतो, तेव्हा मी ग्रेट लेखक आणि मास्टरमाईंडस्द्वारा पुस्तके वाचण्यासाठी आधार घेतो. मी अनेक पुस्तके वाचली आहेत काही पुस्तके आपल्या मनावर गहन प्रभाव टाकतात. महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकात मला "सत्य असलेल्या माझे प्रयोग" सर्वात जास्त आवाहन केले आहे. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकाश वर प्रकाश पूर भिरकावतो आणि विचार. हे जग सोडून गेलेली कल्पना आणि विचार आहेत. हे पुस्तक दोन गोष्टींकडे केंद्रित करते: गांधीजींचे देशभक्ती आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे संघर्ष.

त्यांनी कधीही आपल्या जीवनाबद्दल काहीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी असे मानले की राजकारण नैतिकतेसह सौम्य असले पाहिजे. मला हे पुस्तक आवडते कारण माझ्या आयुष्यात हे बदल घडले आहे. मी या महान पुस्तकातून बरेच काही शिकलो आहे. तो मानवजातीच्या सर्वात मौल्यवान खजिनांपैकी एक आहे. हे खूप चांगले वाचन करते. या पुस्तकाच्या प्रत्येक वाक्याला प्रामाणिकपणाचा स्पर्श आहे. हे एका साध्या परंतु प्रभावी शैलीमध्ये लिहिले आहे. हे वाचनीय आहे.
Answered by M1030
19

Answer:

गेले काही दिवसांपासून, दिवस काय महिन्यांपासून मी एकाच पुस्तकात हरवलेय. त्या पुस्तकाने मला वेड लावले आहे म्हणाना !

खरे तर त्याच्याबद्दल लिहायचे म्हणजे हिन्दी म्हणीनुसार, ‘गागर में सागर भरना’ असे होईल. त्याचा विषयच इतका गहन, त्याचा आवाका इतका अफाट की काही वाक्ये किंवा दोन-तीन पृष्ठांमध्ये त्याबद्दल लिहिणेच हास्यास्पद ठरेल. पानोपानी वा आपण शब्दोशब्दी म्हणू या लेखकाने घेतलेले प्रचंड कष्ट आपणास दिसून येतात.

ते पुस्तक सर्वप्रथम आपणास त्याचा बाह्य आकार, प्रकार, उत्तम छपाई, या गहन विषयाला सोपे करून समजविण्यासाठी दिलेली चित्रे, रेखांकने आणि लेखकाची सुलभ करून शिकवण्यासारखी भाषा यानेच मोहून टाकते.

मी कोण आहे? माझे अस्तित्व काय ? मी या जगात का आलो? हे विश्व म्हणजे काय? असे असंख्य प्रश्न कोणाला पडत नाहीत? पण नुसती गीता वाचून आपल्याला कळते का? साधे आजारपण आले, दु:ख झाले, अपयश आले, कष्ट करावे लागले तरी आपण सहज विचार करतो. मनात संशयाचे काहूर उठते, प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! यांचा गुंता वाढत जातो. खरेच देव आहे का?असलाच तर तो सर्व व्यवस्थित का करत नाही?नेमक्या याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास केलाय, श्री. करंजकरांनी. या पुस्तकाचे सर्वात मोठे श्रेय म्हणजे काय ?

ही फक्त हिंदूंची ‘गीता’ ठरत नाही, ती होते कुठल्याही जाती, पंथ, धर्माच्या, विचारवंत माणसाची नोंदवही. हे पुस्तक वाचायला वयाचेही बंधन नाही. जेवढे ते मला भावले, तेवढेच ते माझ्या मुलाच्याही पसंतीस उतरले.

तसेच अनेक पुस्तकांमध्ये अति क्लिष्ट भाषा व दुर्बोध, अवघड विवेचन असते. परंतु हे पुस्तक अत्यंत मुद्देसूद, नेटके व समजण्यास अतिशय सोपे असे लिहिले आहे, त्यामुळे हे पुस्तक विशेषत: आजच्या अहोरात्र कामात बुडून गेलेल्या व इतर काही अवांतर वाचण्यासाठी वेळच नसलेल्या पिढीला फार उपयुक्त ठरेल, असे वाटते. आजची पिढी जास्त ताणाखाली जगत आहे. त्यांचे ताणतणाव कमी करून जीवनाचा खरा अर्थ समजाविण्यास या पुस्तकाची सोपी, सुटसुटीत, सुबक, चित्रमय भाषा आणि शेवटी ठळक अक्षरांत मुख्य मुद्दे देण्याची लेखकाची कला तरुणांना नक्कीच आकर्षित करते.

अज्ञान म्हणजे काय ? हे देखील लेखक कमी शब्दांत, रेखाचित्रांसह आपल्याला सहज शिकवतो.

१) स्वत…बद्दलचे,

२) या सृष्टीरचनेसंबंधी,

३) ईश्वराबद्दलचे

ही अज्ञानाची तीन क्षेत्रे, पण त्यासोबतच ही तीन क्षेत्रे आपसांत कशी संबंधित आहेत याचे अज्ञान. आपल्याला याचे काही ज्ञान असेलही, पण त्यातल्या मुख्य तत्त्वांबद्दल आपली धारणा स्पष्ट नसेल असेही होऊ शकते किंवा काही चुकीची धारणा आपण ग्राह्य धरून गैरसमजही करून घेतो.

ज्याप्रमाणेे तेज व उष्णता या दोन गुणांनी सूर्याचे स्वरूप भारले आहे, त्याचप्रमाणे सत्, चित्, आनंद हे तीनही आत्म्याचे खरे स्वरूप आहे आणि ब्रह्म स्वत:च कसे हे तीनही असून निर्गुण, संपूर्ण, कुठलाही दोष नसणारे, पवित्र, कल्याणकारी स्वरूप आहे, हे आपल्याला लेखक सहजतेने सांगून जातो.

ईश्वराचे अस्तित्व आहे की नाही, हा कोणालाही पडणारा नेहमीचा प्रश्न. पण अगदी साध्या चित्रांनी, भोपळयावर वडिलांनी केलेल्या सहीच्या कथेने लेखक ते समजावितो. माया म्हणजे काय, सृष्टीकर्ता कोण हे देखील उदाहरण देत लेखक म्हणतो – मायाच प्रकृती आहे. माया या चराचराचे जणू प्रक्षेपण. थिएटरमध्ये असलेल्या फिल्म प्रोजक्टरप्रमाणे ती. त्याच्यात पूर्ण फिल्म आहे, पण तिचे प्रकटीकरण झालेले नाही आणि ते आपणहून स्वत: ते प्रक्षेपितही करू शकत नाही. ते जड, अचल, गतिहीन आहे.

त्याला चालविण्यासाठी कोणाची तरी गरज भासते. ते हात असले तर सिनेमा सुरू होईल. तसेच ‘माया’मध्येच हे निर्माण कार्य सामावले आहे. त्या सृष्टीच्या प्रकटीकरणासाठी ईश्वर ‘माया’चा उपयोग करून घेतो व सृष्टिकर्ता होतो. अशीच त्याची स्थितीकर्ता, नियंता, लयकर्ता ही रूपेही लेखक सोपे करून सांगत जातो.

वर म्हटल्याप्रमाणेे हे पुस्तक कुठलेही जातपात, वयाचे बंधन ठेवत नाही. असे ऐकले आहे की एका २५ वर्षाच्या यवन मुलीने हे पुस्तक वाचले अन् ती भारावून गेली. तिला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर तिने दिलीच, पण आपल्या आई-वडिलांसाठी विकतही घेतले, इतके ते सुलभ करण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. त्याची धाटणी बघून माझा मुलगा गमतीने म्हणतो – हे तर ‘नवनीत डायजेस्ट’च्या वरताण आहे – अर्थात हा विनोदाचा भाग सोडला तरी त्याचा गर्भितार्थ असा की, अगदी झाडून सकलांनी समजून घ्यावे असे पुस्तक प्रस्तुत करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.

त्यांची हीच प्रतिभा, त्यांच्या ज्ञानाची डूब, त्यांचे स्पष्ट विचार यामुळेेे गीतेच्या गाभ्याला न हलवता त्यातले नेमकेे मोती तसेच्या तसे वाचकासमोर ठेवण्यात ते यशस्वी होण्यात कारणीभूत आहेत.

ते निर्मळ, तजेलदार, पाणीदार, चकाकणारे स्फटिकासमान मोती सर्व वाचकांना मिळो, हीच सदिच्छा!

हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये आहे, पण भाषा समजण्यास अत्यंत सोपी आहे.

पुस्तकाचे नाव…Gita Bodh ( understanding life and beyond )

लेखक………. .Uday Karanjkar

प्रकाशक……… Uday Karanjkar..(स्वतः लेखक )

छपाई……….. .Spectrum Offset. Pune

किंमत………. Rs.1599/-

पृष्ठसंख्या…….. 544

चित्रकार……… Rahul Deshpande

छायाचित्रे : लेखिकेच्या संग्रहातून

सौ. स्वाती वर्तक

मुंबई 52

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Similar questions