i want marathi nebandh mazzi aai for exam plz help
Answers
माझ्या आईचे नाव ___________ आहे, ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. ती खूप सुंदर आणि प्रेमळ आहे. ती आमच्या सगळ्यांची खूप काळजी घेते. रोज सकाळी ती लवकर उठते, आमच्यासाठी चहा, नाश्ता बनवते. मला शाळेची तयारी करायला मदत करते. बाबांना आणि मला डबा भरून देते. आमच्या येथे स्कूल बस येत नाही, मग आई मला शाळेत सोडायला आणि न्यायला सुद्धा येते.
एवढे सगळं आवरून ती नोकरी पण करते. ती एका मोठ्या आय टी कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. ऑफिस मध्ये आईचा सगळे खूप आदर करतात. माझी आई सोसायटी ची अध्यक्षा सुद्धा आहे. ती एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या कश्या सांभाळते याचे सर्वांना खूप आश्चर्य वाटते.
माझी आई मला होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते. मी आजारी पडलो की ती माझी खूप काळजी घेते. ती फक्त माझी आई नाहीतर मैत्रीण सुद्धा आहे. तिला वेळ मिळाला की ती माझ्यासोबत खेळते सुद्धा. माझी आई नेहमीच खूप हसतमुख असते, त्यामुळे घराचे वातावरण खूप चांगले राहते. माझे बाबा सुद्धा आईची खूप प्रशंसा करतात.
पण कधी कधी ती माझ्यावर चिडते सुद्धा. जर मी होमवर्क वेळेत पूर्ण केला नाही, उन्हात जास्त वेळ खेळलो तर ती मला ओरडते. तिला खोट बोललेलं आजिबात आवडत नाही. माझी आई खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे, त्यामुळे तिचे हे गुण थोडे माझ्या मध्ये सुद्धा आले आहेत. मी सकाळी वेळेत उठतो, वेळेत सगळा अभ्यास उरकतो, आणि यातून खेळासाठी ही वेळ काढतो.
माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. तिला मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य सुद्धा आवडते. मराठी “नटसम्राट” आणि शेक्सपिअर चे “हॅम्लेट” खूप आवडते. तिच्या मुले मलाही वाचनाची आवड निर्माण झाली आहे, ती माझ्यासाठी वेगवेगळी पुस्तके, कॉमिक्स आणते.
माझी आई आणि तिच्या दोन मैत्रिणी एक ब्लॉग सुद्धा चालवतात. तिथे त्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांसंबधित प्रश्न,समस्यांवर लिहतात. मागच्या वर्षी त्यांच्या ब्लॉग ला “बेस्ट मराठी ब्लॉग ऑफ द इयर” पुरस्कार सुद्धा मिळाला.
माझी आई जगातली सगळ्यात चांगली आई आहे, मला वाटते माझ्या आई सारखी आई सगळ्यांना मिळावी. ती माझी रोल मॉडेल आहे, मला एक दिवस तिच्या सारखे बनायचे आहे, ती माझी प्रेरणास्थान आहे. आपण सर्वांनीच आपल्या आईवर मनापासून प्रेम केले पाहिजे. तिला तिच्या प्रत्येक कामामध्ये थोडीफार मदत केली पाहिजे. त्यामुळे तिला आनंद होईल आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळेल. आपण आईचा आदर केला पाहिजे तिला समजून घेतले पाहिजे.
म्हणूनच तर म्हणतात, आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही.