i will mark the first answer as brainliest
very urgent pls help only in marathi
uses of computer in marathi
Answers
संगणक आपल्या रोजच्या जीवनाचा इतका भाग झाला आहे की, जणू सर्वव्यापी परमात्म्याचेच दुसरे रूप असावा.
गेल्या दशकापासून संगणक आपल्या रोजच्या जीवनाचा इतका भाग झाला आहे की, जणू सर्वव्यापी परमात्म्याचेच (दोन्ही ‘नरे निर्मिले’ याच पंथातले!!) दुसरे रूप असावा. बँक, खरेदी, प्रवासाची तिकिटे, खाणे मागवणे.. कुठलेही काम आता घरबसल्या होत आहे. घरातील कामाच्या नियोजनापासून ते परग्रहावरील यानाचे नियंत्रण करणारे हे यंत्र, लोकांना काम टाळायलाही एक नवीन सबळ आणि प्रभावी कारण पुरवत आहे. ‘शिष्टीम डाउन’ हे वाक्य कधीही, कुठेही ऐकून घ्यायची आता आपली तयारी झाली आहे. बरं आता शिष्टीमच चालत नाही म्हटल्यावर समोरचा पामर तरी काय करणार, असा सहानुभूतीचा विचारही आपण आपसूकच करू लागलो आहोत. ही जी ‘शिष्टीम’ म्हणून वावरणारी, काम करणारी आणि नसल्यामुळे खोळंबा करणारी वस्तू आहे, ती म्हणजे संगणकातील कामकाज प्रणाली (Operating System) संगणक चालवणारी व्यवस्था.
सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार?
संगणकाची वैशिष्ट्ये
१. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.
२. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.
३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.
४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रण, गुणपत्रिका छपाई इत्यादी.
५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.
६. संगणकाच्या सर्व क्रियांमध्ये सातत्य, विश्वासार्हता दिसून येते.
७. संगणकाची विविधांगी उपयोगिता पाहता त्यावर होणारा खर्च नगण्य आहे.
८. भावनिक दृष्टीने कोणत्याही प्रसंगाचा संगणकाच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
hope it is useful...!!
mark as brainliest...!!✌✌