Hindi, asked by eramomin1, 11 months ago

I wnt an easy Marathi Farmer essay

Answers

Answered by bhagirath0
2

आपला भारत देश हा ऐंशी टक्के कृषिप्रधान आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? पण त्याच्या या कष्टाला आणि मेहनतीला म्हणजेच त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. जसे की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तर कधी वादळ यामुळे शेतीचे बरेच नुकसान होते. त्यामुळेच तर आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. पण यावर आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे. आपला हा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबतो. म्हणूनच तर ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश की धरती’ यांसारख्या ओळी आपल्या ओठांवर सहज येतात. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, ‘जिथे राबती हात तेथे हरी’ अशी शेतीच्या महतीची वचने आपण नेहमी ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहितो. परंतु शाळेतील परीक्षांमधील गुणवंताच्या तोंडून मी डॉक्टर, मी इंजिनिअर होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात. पण यापैकी कोणीच ‘मी एक आदर्श शेतकरी होणार’ आणि मी माझे जीवन शेतकामामध्ये झोकून देणार असे कोणीच म्हणत नाही. शेतकरी म्हणजे दुय्यम समाज असा दृष्टिकोन आजच्या या नवीन पिढीचा झाला .

MARK AS BRAINLIST

Similar questions