IAS Question
एक व्यक्ती ठराविक रक्कम घेऊन आपल्या 3 बाहिणीकडे जायला निघतो.
1) पहिल्या बाहिणीकडे गेला असता सकाळी अंघोळ करताना बहिण त्याचे पाकीट पाहते. पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढी स्वतः जवळील रक्कम ती पाकीटात टाकते.
निघताना भाऊ तिला 2000 रुपये देतो.
2)नंतर तर तो दुसऱ्या बाहिणीकडे जातो. तिही तो अंघोळ करीत असताना त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे.तेवढीच स्वतः कडील रक्कम त्याच्या पाकीटात टाकते. निघताना तो तिला 2000 रुपये देतो.
3) नंतर तो तिसऱ्या बहिणीकडे जातो तेथेही तो अंघोळ करीत असताना बहिण त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढीच स्वतः कडील रक्कम टाकते.
घरी निघताना तो तिला 2000 रुपये देतो.
घरी पोहचल्यावर त्याच्या पाकीटात 5000 रुपये शिल्लक असतात.
तर घरातून निघताना त्याच्याकडे किती रुपये असतात.
बघुया ग्रुप मधे किती टॅलेंट आहे
Answers
उत्तर - 2375 रूपये.
विवरण –
समजा व्यक्ति जवळ x रूपये आहेत.
पहिल्या बाहिणीने व्यक्तिच्या पाकीटात जेवढी रक्कम होती तेवढीच स्वतः जवळील रक्कम ती पाकीटात टाकली म्हणजे व्यक्तिजवळ रकम झाली 2x.
2x मधून 2000 रूपये त्याने बहिनीला दिले. आता शिल्लक रकम आहे (2x – 2000)
आता तो व्यक्ति दुसऱ्या बाहिणीकडे जातो. ती देखील त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे.तेवढीच स्वतः कडील रक्कम त्याच्या पाकीटात टाकते म्हणजे आता रकम झाली (2x – 2000 + 2x – 2000) = (4x – 4000).
निघताना तो दुसऱ्या बाहिणीला देखील 2000 रुपये देतो. आता शिल्लक रकम आहे (4x – 4000 – 2000) = (4x -6000).
नंतर तो तिसऱ्या बहिणीकडे जातो. ती देखील त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे.तेवढीच स्वतः कडील रक्कम त्याच्या पाकीटात टाकते म्हणजे आता रकम झाली (4x – 6000 + 4x – 6000) = (8x – 12000)
निघताना तो तिसऱ्या बाहिणीला देखील 2000 रुपये देतो. आता शिल्लक रकम आहे (8x – 12000 – 2000) = (8x – 14000).
घरी पोहचल्यावर त्याच्या पाकीटात 5000 रुपये शिल्लक असतात.
म्हणजे (8x – 14000) = 5000
8x = 19000
x = 2375
घरातून निघताना व्यक्तिजवळ 2375 असतात.
check –
घरातून निघताना व्यक्तिजवळ 2375 असतात.
पहिल्या बहीनीकडे, रकम झाली 2375 + 2375 = 4750.
पहिल्या बहिनीला 2000 दिले. आता रकम शिल्लक राहिली 4750 – 2000 = 2750.
आता दुसऱ्या बाहिणीकडे, रकम झाली 2750 + 2750 = 5500.
दुसऱ्या बाहिणीला देखील 2000 रुपये दिले, आता रकम शिल्लक राहिली 5500 – 2000 = 3500
तिसऱ्या बहिणीकडे रकम झाली 3500 + 3500 = 7000
तिसऱ्या बाहिणीला देखील 2000 रुपये दिले, आता रकम शिल्लक राहिली 7000 – 2000 = 5000.