IBC चे नामकरण काय झाले?
Answers
IBC चे नामकरण काय झाले?
उत्तर:- IBC म्हणजे 'इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनी' ह्या रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम ISBS म्हणजेच 'इंडियन स्टेट ब्रॉड कास्टिंग सर्व्हिसेस कंपनी' असे नामकरण केले व नंतर ८ जुन १९३६ रोजी 'ऑल इंडिया रेडिओ' असे नामकरण केले. स्वतंत्र भारतात AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIR ला 'आकशवानी' असे नाव दिले गेले. आकाशवाणीवर सुरवातीस शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली जात असे. नंतर शेतकरी,युवा,कामगार,महिला,मुले, अश्या सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सादर केले जाऊ लागले.
स्वतंत्र पुर्व कालखंडात 1924 मध्ये,
' इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनी ' ( IBC ) या
नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे
एक खाजगी रेडिओ केंद्र सुरु केले.
नंतर ब्रिटिश सरकारने या कंपनी चे
' इंडियन स्टेट ब्रॉडकास्टींग सर्व्हिसेस ' ( ISBS)
असे नामकरण केले.
8 जून 1936 रोजी या कंपनी ला " ऑल
इंडिया रेडिओ" ( AIR ) असे नाव देण्यात आले.
भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप
होते. ख्यातनाम कवी पंडीत नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ' आकाशवाणी ' हे नाव दिले गेले.
आकाशवाणी तर्फे विविध मनोरंजन पर ,प्रबोधन पर , व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात . त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्या साठी विशेष कार्यक्रम प्रसारित
केले जातात.