India Languages, asked by biswajit6908, 9 months ago

If sinhagad could speak essay in Marathi

Answers

Answered by deepesh5038
0

Answer:

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

सिंहगड

Sinhagad pune.JPG

सिंहगड

सिंहगडचे ठिकाण दाखविणारा नकाशासिंहगडचे ठिकाण दाखविणारा नकाशासिंहगड

नाव

सिंहगड

उंची

४४००फुट.

प्रकार

गिरीदुर्ग

चढाईची श्रेणी

मध्यम

ठिकाण

पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव

सिंहगड

डोंगररांग

भुलेश्वर

सध्याची अवस्था

जीर्ण

स्थापना

{{{स्थापना}}}

कल्याण दरवाजा

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

इतिहास संपादन करा

सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार

Broom icon.svg

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा आहे. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. [[दादोजी कोंडदेव]] हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. [[इ.स. १६४९]] मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

पुणे दरवाजा

सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी (मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंढाणा हे नाव बदलून "सिंहगड" असे नाव ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.

पहा सिंहगडाची लढाईगड आला पण सिंह गेला

आजचा सिंहगड

या युद्धाबाबत सभासद

बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.

तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, मशाल , चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालुन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.

शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'.

माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.

सिंहगडावरील माहितीफलकानुसार संपादन करा

सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.

अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.

शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.

दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्‍न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.

इतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे..

शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

Answered by halamadrid
1

◆◆जर सिंहगड बोलू लागले तर!◆◆

एकदा मी माझ्या कुटुंबासोबत सिंहगड पाहायला गेले होते.मी फोटो काढायला एकटीच पुढे गेले,त्यानंतर मी थोड़ा वेळ गडाला पाहत एका बाजूला बसून राहिली होती.तेव्हा माझ्या मनात विचार आला,जर सिंहगड बोलू लागले तर!

तर ते म्हणेल, "मुली कशी आहेस? मी सिंहगड़ बोलत आहे.मला २००० वर्षांपूर्वी बांधले गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील योद्धा तानाजी मालुसरे यांनी मुघलांसोबत युद्ध लढून मला जिंकले होते".

" वर्ष १६७० मध्ये सिंहगडचे युद्ध तर तुम्हाला ठाऊकच असेल.मला मिळवण्यासाठी बरेच युद्ध लढले गेले आहेत".

"मी एक प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटक स्थान असून बरेच पर्यटक मला पाहायला येतात.माझ्या परिसरात फोटो काढतात,त्यांना येथे येऊन खूप आनंद मिळते."

"मी आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा जपतो.म्हणून माझी स्वच्छता ही तुमची जबाबदारी आहे.तुम्ही मला पाहायला येता,याच्यामुळे मला आनंद मिळतो.पण,तुम्ही मला स्वछसुद्धा ठेवत जा".

"माझ्या आवारात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या किंवा खायच्या वस्तूंची पाकीटं फेकत जाऊ नका.माझ्या भिंतिंवर काहीबाही लिहू नका.माझी काळजी घेत जा".

एवढ्यातच माझ्या बाबांनी मला हाक मारली आणि मी पटकन माझ्या विचारांच्या दुनियेतून बाहेर पडले.

Similar questions