Environmental Sciences, asked by Anissafernande, 1 year ago

If there were no farmers.......then essay in marathi

Answers

Answered by halamadrid
14

Answer:

शेती हा आपल्या देशातील सर्वात महत्वपूर्ण व्यवसाय आहे. शेतकऱ्याला 'अन्नदाता' असे म्हटले जाते.

शेतकरी नसला तर,लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.शेती करणे जितके सोपे दिसत असते,वास्तवात ते इतके सोपे नसते.शेतकरी नसल्यावर आपल्याला शेतात दिवस रात्र काम करावे लागेल,तेव्हा जाऊन आपल्याला खायला अन्न मिळेल.तेव्हा तरी आपल्याला अन्नाचे महत्व कळेल.

शेतकरी नसला तर,आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार वाईट परिणाम होईल कारण बर्‍याच कृषी उत्पादनांची निर्यात बाहेर देशांमध्ये केली जाते.शेतकरी केवळ खाता येईल अशी पिके पिकवत नाही,तो विविध उद्योगांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वापले जाणारे पिके तयार करतो. काही पिकांचा उपयोग जनावरांना अन्न म्हणून वापरले जाते.

शेतकरी दिवसभर शेतात खूप मेहनत करतो.कडक उन्हात,पावसातसुद्धा तो शेतामध्ये राबत असतो.बी पेरल्यापासून ते अन्न पूर्णपणे तयार होईपर्यंत तो प्रत्येक पीकाची खूप काळजी घेत असतो.त्याचे काम खूप कठीण असते.

अशा वेळी,शेतकरी नसता तर हा विचारसुद्धा खूप भयंकर आहे.

Explanation:

Similar questions