If there were no trees in marathi
Answers
वृक्ष नष्ट झाले तर
वृक्ष हे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहिले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच खरं जीवनाच आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत आणि यामुळे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. आज वृक्ष नष्ट झाल्यामुळे सर्व प्रदेश, पहाड़, जंगल ओसाड पड़ले आहेत. औषधीयुक्त वनस्पतीं मिळण ही दुर्मिळ झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे.
पाऊस कमी पडल्यामुळे सर्वात मोठी समस्या जानवते आहे ती पाणीटंचाई ची. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड़ झाल्यामुळे व नवीन वृक्षांची लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरात उंच-उंच इमारतीचे बांधकाम, रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी करण्या करता मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा वाढलेला आहे. देशात अधिकतर ठिकाणी तापमान ४५° C पेक्षा अधिक पोहचला आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना पर्यावरण रक्षणाकडे, मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
जंगल तोडी मुळे जंगलातील प्राणीही बेघर होत आहेत. आणि ते मानवी वस्त्यांमध्ये शिरून भक्ष व आसरा शोधत आहेत. आणि यामुळे जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. हे सर्व थांबवण्याकरिता नागरीकात वृक्षतोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. जंगलाची उपयुक्तता व वृक्षारोपण करण्या मुळे होणारे फायदे याची माहिती नागरिकात पोहचवलीत पाहिजे.
जर सर्व झाडे कापून टाकली, तर पाणीची कमी होईल, तापमान वाढणार, रोगराई पसरणार. आणि संपूर्ण पर्यावरण नष्ट झाले तर भविष्यात पृथ्वीचे काय होईल? आणि वुक्षतोडीला जवाबदार ठरणारा मनुष्यच हे सर्व थांबवून सृष्टीला वाचवू शकतो.