(ii) ताजमहालचे सौंदर्य अवर्णनीय आहे. (उद्गारार्थी करा )
Answers
Answer:
ताजमहालचे सौंदर्य अवर्णनीय आहे. (उद्गारार्थी करा )
किती अवर्णनीय आहे ताजमहालचे सौंदर्य!
दिलेले वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे व दिलेल्या प्रश्नानुसार आपल्याला त्याला उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे.
उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करत असताना अचानक आलेल्या भावना आपल्याला दाखवाव्या लागतील आणि त्यासाठी आपल्याला किती या शब्दापासून सुरुवात करावी लागेल व त्यानंतर विशेषण वापरून सर्वात शेवटी नाम लिहावे लागेल व उद्गारार्थी चिन्हाचा वापर करावा लागेल.
उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय?
उद्गारार्थी वाक्य हे असे वाक्य असते ज्यातून माणसाच्या एखादी गोष्ट बघितल्यावर अचानक आलेल्या भावना स्पष्ट केल्या जातात. उस्फूर्तपणे ज्यावेळेस भावना अचानकपणे बाहेर पडतात अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
- किती सुंदर इमारत आहे ही!
- बापरे! त्याला साप चावला. बापरे! किती भला मोठा पहाड.
- किती सुंदर फुल आहे हे!
वरील दिलेल्या प्रत्येक वाक्यामध्ये उत्स्फूर्तपणे भावना व्यक्त केलेल्या आहेत म्हणून वरील वाक्य हे उद्गारार्थी वाक्याचे उदाहरणे आहेत.
वाक्यांच्या प्रकाराबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/23947826
https://brainly.in/question/15738167
#SPJ3