Music, asked by Rahulmaske, 3 months ago

ii)
उंबराच्या झाडांची वैशिष्ट्ये​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

वैशिष्ट्ये :

याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो हा समज बहुतेक ठिकाणी खरा ठरतो.

झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. (उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! जग हे बंदीशाला राजा परांजपे यांच्या 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातले गीत).

Attachments:
Similar questions