India Languages, asked by zaidsiddiquee11, 3 months ago

iii)
कल्पनात्मक लेखन (परीक्षा नसत्या तर)
मुद्दे
(एक मजेदार कल्पना परीक्षांचे विविध प्रकार
परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणारी बंधने
परीक्षा नसल्यामुळे होणारे फायदे----तोटे परीक्षांची आवश्यकता)​

Answers

Answered by riyabante2005
3

परीक्षा नसत्या तर

नुसता विचारही किती सुखावह आहे.. “परीक्षा नसत्या तर??". शालेय जिवनात विद्यार्थी कित्तेक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि. टी. एक ना दोन असंख्य परीक्षांचा भडीमार चालु असतो वर्षभर शिकतो म्हणुन परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणुन शिकतो असा प्रश्न मनामध्ये तरळुन जातो.

परीक्षांचे वेळापत्रक लागले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळ यायला लागले की सारं वातावरणच बदलुन जाते. विषेशतः वार्षीक परीक्षा. घरातला दुरदर्शन बघणे तसेही अशक्यच असते, ह्या काळात तर तो दुरदर्शनचा आवाजही ऐकु येत नाही. खेळाची मैदाने ओस पडलेली असतात. बाहेर पानगळतीचा हतु चालु झालेला असतो. कोपऱ्या कोपऱ्यावर उसाची गुन्हाळ असतात. शाळेत वाचनलयातुन एखादे पुस्तक आणावे म्हणुन चक्कर मारावी तर शाळाही ओसच असतात. एखादा दुसरा मित्र भेटतो पण त्याच्याही चेहऱ्यावर परीक्षांचे ओझे दिसत असतेच.

अश्या ह्या परीक्षाच बंद झाल्या तर कित्ती मज्जा येईल. सगळीकडे आनंदी आनंद पसरेल. परीक्षांच्या चिंता नाहीत, वेळापत्रकांचे ओझे नाही, अभ्यासाची कटकट नाही. परीक्षा नाहीत तर गुण नाहीत, टक्केवारी नाही, पास / नापास व्हायची चिंता नाही. कुणी 'हुशार' कुणी 'ढ' असा भेदभावच होणार नाही. शालेय जिवनाची सर्व संकृतीच बदलून जाईल.

पण.. परीक्षा नाही झाल्या, सगळेच पास झाले तर खऱ्या गुणवत्तेचा कस कसा लागणार? शाळा-कॉलेजातुन बाहेर पडल्यावर जेव्हा आपण आयुष्यातील खऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ तेंव्हा आपले हात-पाय थरथरायला लागतील कारण त्यावेळेस परीक्षांना सामोरे जायला आपण तयार नसु. परीक्षा नसेल तर आपण मिळवलेले ज्ञान आणि त्याचा समजलेला अर्थ हा चुक का बरोबर हे कसे समजणार? भारत देश्याला 'विकसनशील' देशापासुन विकसीत' देश अशी ओळख करुन घ्यायला गरज आहे खऱ्या गुणवंतांची. अश्या लोकांची जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवतील, भारत देश्याचे नाव जगाच्या नकाश्यावर ठळक करतील. परीक्षाच नाही झाल्या तर कदाचीत खरी गुणवत्ता झाकोळली जाईल. नाकर्त्या लोकांची नोकर्यांमध्ये भरती झाली तर त्या कंपनीची स्थीती खालावेलच पण अनुषंगाने भारत देशाची सुध्दा प्रगतीच्या मार्गावरील घौडदौड मंद होईल.

परीक्षाच नाही म्हणलं तर, शिक्षणाचे अंतीम ध्येयच नसले तर कश्याला कोण शिकेल आणि कश्याला कोण ज्ञानार्थी होईल?

परीक्षा हव्यातच. परीक्षा व्यक्तीला त्याची विद्या आणि त्याची बुध्दी अधीक तल्लख करायला भाग पाडतात. परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना अधीका अधीक ज्ञान मिळवण्यासाठी आणि मिळवलेले ज्ञान पुन्हा पुन्हा पडताळुन पाहण्यासाठी भाग पाडतात. परीक्षा मनुष्याला आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात.

त्यामुळे परीक्षा नसत्या तर हा विचार सुखावह असला तरी त्याचे परीणाम भावी आयुष्यात नक्कीच सुखावह नसतील.

Similar questions