ईतिहास च्या साधण्याचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय
Answers
इतिहास म्हणजे गतकाळातील घडलेल्या घटना. ज्या घटना प्रसंग भूतकाळात घडून गेलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला विविध स्त्रोतांद्वारे माहिती मिळते. गतकाळातील चुका भविष्यात घडू नये म्हणून इतिहास मदत करतो. भूतकाळातील शौर्य वीर गाथा किंवा वीरांची माहिती इतिहासामुळेच कळते. या सर्वांची माहिती आपल्याला विविध प्रकारच्या ऐतिहासिक स्त्रोतांद्वारे मिळते. या स्त्रोतांची निगा राखणे काळाची गरज बनली आहे. ती पुढीलप्रमाणे करता येईल.
१) किल्ले, स्मारके इ. नियमितपणे डागडुजी करणे.
२) इतिहास कालीन वास्तूवर , स्मारकावर नावे लिहिणे किंवा त्यांची तोडफोड करणे टाळावे.
३) मौखिक स्रोत जसे - लोक गीत इ. दाखवा त्यांची माहिती एकत्रित करून ते लिखित स्वरूपात जतन करून ठेवावेत.
४) विविध प्रकारच्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यासाठी ऐतिहासिक संग्रहालय यांची स्थापना मोठ्या प्रमाणात व्हावी.
५) ऐतिहासिक संग्रहालयामध्ये ठेवलेल्या वस्तू, नाणी इ. वस्तूंचे चोरांपासून रक्षण करावे.
६) जुन्या आणि ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा.
७) हवामान बदलामुळे काही ऐतिहासिक वस्तू मध्ये बदल होतात किंवा खराब होतात त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याची काळजी घ्यावी
८) ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी शासनाने केलेल्या कायदा कागदोपत्री न ठेवता त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी बजावणी करावी.
९) ऐतिहासिक वास्तूंची निगा राखण्यासाठी अनुभवी व तज्ञ व्यक्तींनाच प्राधान्य द्यावे.
१०) ऐतिहासिक साधनांचे जतन करण्यासाठी सामान्य नागरिकांना जागरूक राहणे तसेच त्यांचे प्रबोधन करावे.