Hindi, asked by bhavikg, 25 days ago

इमारतीभोवती काय आहे।​

Answers

Answered by ltzSweetAngel
2

Answer:

इमारती व घरे : ऊन, वारा, पाऊस यांपासून व हिंस्र पशूंपासून संरक्षण व वैयक्तिक व्यवहाराकरिता आडोसा मिळेल असा आसरा मिळविण्याच्या मूलभूत प्रेरणेतून घरे व इमारतींचा उगम व विकास झालेला आहे. अगदी प्रथम माणसाने झाडाचा आश्रय घेतला, नंतर गुहा व झाडाच्या फांद्या व गवत यांचे निवार्‍यापुरेसे आसरे तयार करू लागला. त्यानंतर माणसास उभे राहून व्यवहार करता येतील अशा झोपड्या तयार झाल्या. सु. ६,००० वर्षांपूर्वी मातीच्या कच्च्या ओबडधोबड विटांची चौकोनी आकाराची घरे बांधण्यास सुरुवात झाली. त्यांच्या विकासातून वाडे, किल्ले, निरनिराळ्या आकाराच्या व आकारमानाच्या इमारती उभारल्या जाऊ लागल्या व मनुष्याच्या इतर प्रगतीबरोबर आधुनिक बंगले, राहण्याच्या गाळ्याच्या टोलेजंग इमारती, गगनचुंबी इमारती, कारखान्याच्या व इतर खास उपयोगाच्या सार्वजनिक इमारती यांची सर्व सुखसोईयुक्त बांधणीत प्रगती झाली. ज्या त्या काळातील परिस्थितीनुरूप घराच्या बांधणीच्या पद्धतीत फरक पडत गेले. घरांच्या प्राथमिक अवस्थेत आसर्‍यास पुरेशी एक खोली असे व स्वयंपाकपाणी वगैरे बराचसा इतर व्यवहार वाडेभिंतीच्या आत उघड्यावर करीत असत, घरांना खिडक्यांऐवजी सुरक्षिततेच्या दृष्टीने जमिनीपासून उंच अंतरावर लहान झरोके ठेवीत असत. त्या काळात घरामध्ये भरपूर हवा व उजेडाची तरतूद करण्याची आवश्यकता भासत नव्हती. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर वातानुकूलनाच्या, वायुवीजनाच्या, प्रकाशाच्या, दूरचित्रवाणी व इतर दळवळणाच्या, निरनिराळ्या साधनांच्या उपलब्धतेमुळे व वातावरणातील दूषित हवा व आवाज यांचा उपद्रव टाळण्याकरिता खिडक्यांविना इमारती बांधणे आता शक्य होत आहे. व्यक्ती, समाज व त्यांचा परिसर सुखदायक, सुरक्षित व उन्नतीपोषक राहील अशी घरांची व इमारतींची बांधणी असावी लागते.

Answered by SHREYA24241
0

Answer:

ऊन, वारा, पाऊस यांपासून व हिंस्र पशूंपासून संरक्षण व वैयक्तिक व्यवहाराकरिता आडोसा मिळेल असा आसरा मिळविण्याच्या मूलभूत प्रेरणेतून घरे व इमारतींचा उगम व विकास झालेला आहे. अगदी प्रथम माणसाने झाडाचा आश्रय घेतला, नंतर गुहा व झाडाच्या फांद्या व गवत यांचे निवार्‍यापुरेसे आसरे तयार करू लागला. त्यानंतर माणसास उभे राहून व्यवहार करता येतील अशा झोपड्या तयार झाल्या. सु. ६,००० वर्षांपूर्वी मातीच्या कच्च्या ओबडधोबड विटांची चौकोनी आकाराची घरे बांधण्यास सुरुवात झाली. त्यांच्या विकासातून वाडे, किल्ले, निरनिराळ्या आकाराच्या व आकारमानाच्या इमारती उभारल्या जाऊ लागल्या व मनुष्याच्या इतर प्रगतीबरोबर आधुनिक बंगले, राहण्याच्या गाळ्याच्या टोलेजंग इमारती, गगनचुंबी इमारती, कारखान्याच्या व इतर खास उपयोगाच्या सार्वजनिक इमारती यांची सर्व सुखसोईयुक्त बांधणीत प्रगती झाली. ज्या त्या काळातील परिस्थितीनुरूप घराच्या बांधणीच्या पद्धतीत फरक पडत गेले. घरांच्या प्राथमिक अवस्थेत आसर्‍यास पुरेशी एक खोली असे व स्वयंपाकपाणी वगैरे बराचसा इतर व्यवहार वाडेभिंतीच्या आत उघड्यावर करीत असत, घरांना खिडक्यांऐवजी सुरक्षिततेच्या दृष्टीने जमिनीपासून उंच अंतरावर लहान झरोके ठेवीत असत. त्या काळात घरामध्ये भरपूर हवा व उजेडाची तरतूद करण्याची आवश्यकता भासत नव्हती. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर वातानुकूलनाच्या, वायुवीजनाच्या, प्रकाशाच्या, दूरचित्रवाणी व इतर दळवळणाच्या, निरनिराळ्या साधनांच्या उपलब्धतेमुळे व वातावरणातील दूषित हवा व आवाज यांचा उपद्रव टाळण्याकरिता खिडक्यांविना इमारती बांधणे आता शक्य होत आहे. व्यक्ती, समाज व त्यांचा परिसर सुखदायक, सुरक्षित व उन्नतीपोषक राहील अशी घरांची व इमारतींची बांधणी असावी लागते.

Similar questions