India Languages, asked by nairaditya2009, 7 months ago

importance of exercise in Marathi essay​

Answers

Answered by drashtigudhka
2

Answer:

आयुर्वेदाने व्यायामाचा अंतर्भाव दिनचर्येत केला आहे व त्यापूर्वी अभ्यंग करण्यास सांगितले आहे. अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावण्याची क्रिया. तसेच व्यायाम केल्यानंतर संपूर्ण शरीराला हळूवार दाबण्यास सांगितले आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायामासारखा दुसरा उपाय नाही. नियमित व्यायामामुळे शरीर लवकर म्हातारे होत नाही. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीने एखादवेळेस विरुध्द भोजन म्हणजेच परस्पर विरोधी पदार्थांचा समावेश असणारे हानीकारक जेवण जरी खाल्ले तरी त्यामुळे त्याला काही बाधा होत नाही. तसेच एखादवेळेस अतिशय चमचमीत किंवा शरीरात दाह निर्माण करणारे जेवण जरी खाल्ले तरी ते पचविले जाते. योग्य प्रमाणात व्यायाम झाल्याची लक्षणे म्हणजे व्यायाम करताना घाम येणे, श्वासाचा वेग वाढणे, दम लागणे ही आहेत. प्रमाणाबाहेर व्यायाम केल्यामुळे शरीर थकते, मानसिक दुर्बलता येते, रसादी धातूंचा ऱ्हास होतो, वारंवार तहान लागते. तसेच रक्तपित्त, दमा, खोकला, ज्वर, सर्दी यांसारखे आजार होतात.

अधिक प्रमाणात संभोग करणाऱ्या, वजनदार सामान उचलणाऱ्या व वाहून नेणाऱ्या, काबाडकष्ट करून कृश झालेल्या व्यक्तींनी व्यायाम करू नये, असे चरकाचार्य म्हणतात. तसेच अतिशय चिडलेल्या, घाबरलेल्या, दु:खी, कष्टी व्यक्तींनी सुध्दा व्यायाम करू नये. वात-पित्त प्रकृतीचे बालक, म्हातारे, वातज प्रकृतीची व्यक्ती, जे जोराने व सतत बोलतात किंवा त्यांना तसे बोलावे लागते अशा व्यक्ती, तहानलेले, उपाशी व अपचन झालेले व्यक्ती यांनी सुध्दा व्यायाम करू नये असे ग्रंथांत वर्णन आहे.

Explanation:

Hope it's help you.

Please mark me as Brainliest & thank my answer.

Answered by s52352953
2

Answer:

व्यायाम म्हणजे काय..?

शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शरीर मजबुत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम असे म्हणतात. व्यायामामुळे शारीरीक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो. तुम्ही जर चार्जिग केलं नाही तर तुमचा मोबाइल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला, मनाला, डोक्याला रीचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज 30 मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम म्हणजे खरं री-क्रिएशन. एकदा व्यायामाची सवय लागली की व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा एक भागच होऊन जाईल.

नियमित व्यायामाचे फायदे :

• व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते.

• ‎व्यायामामुळे स्नायूंची (मसल्सची) शक्ती, लवचिकता वाढते. मसल्स मजबूत बनतात.

• ‎शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते,

• ‎शरीराच्या चयापचयाच्या गतीमध्ये सुधारणा होते.

• ‎हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. पर्यायाने स्टॅमिना वाढतो.

• ‎शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते पर्यायाने रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते.

• ‎रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते.

• ‎कोलेस्टेरॉल नियंत्रित होते.

• ‎मानसिक तणाव कमी होतो. मन ताजेतवाने, प्रसन्न बनते.

• ‎व्यायामामुळे आळस नाहीसा होतो.

• ‎झोप व्यवस्थित लागते.

• ‎कार्य करण्याची स्फुर्ती मिळते, आत्मविश्वास वाढतो.

• ‎उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या सर्व विकारांपासून दूर राहण्यास व्यायामामुळे मदत होते.

त्यामुळे फिट आणि निरोगी आयुष्य जगायचे असल्यास, आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. येथे क्लिक करा व व्यायाम सुरू कसा करावा यासंबंधी महत्वाच्या फिटनेस टिप्ससुद्धा जाणून घ्या..

व्यायामाचे विविध प्रकार :

(1) एरोबिक व्यायाम –

हृदयाची, फुफुसांची आणि स्नायूंची गती आणि शक्ती वाढवणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम म्हणतात. चालण्याचा व्यायाम, सायकल चालवणे, पोहणे, दोरीउड्या, जॉगिंग, ग्रुप अॅक्टिव्हिटी जसे झुम्बा एरोबिक्स, पॉवर योगा हे एरोबिक व्यायाम आहेत. अशा व्यायामामध्ये हृदयाचे ठोके आणि श्वासाचे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांनी वाढले पाहिजे आणि ते 20 ते 30 मिनीटे करायला हवा. अशा व्यायामामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, म्हणजेच न थकता काम करता येण्याची शक्ती वाढते. हा व्यायाम हृदयविकार असलेल्या व्यक्तींही डॉक्टरच्या सल्ल्याने करू शकतात.

(2) अॅनेरोबिक व्यायाम (Anaerobic Exercise) –

ताकद म्हणजे कुठलीही क्रिया करण्याची स्थिती. ताकद वाढण्यासाठीच्या व्यायामाला अॅनेरोबिक व्यायाम म्हणतात. या प्रकारांमध्ये जलदरित्या हालचाली कमी वेळात कराव्या लागतात. ह्यात वजन उचलणे, जोर बैठका, वेगाने धावणे आदी प्रकारांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या व्यायामामुळे कमी वेळात जास्त ऊर्जा (कॅलरीज) वापरली जाते. ह्या व्यायामामुळे आपले स्नायू पिळदार व डौलदार दिसतात. हा व्यायाम हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी करू नये.

Explanation:

hope.it help u

plzz follow me

Similar questions