India Languages, asked by Tanushreesahare, 1 year ago

Importance of prayer essay in marathi...??

Answers

Answered by karishma8283
6

Explanation:

एखाद्याचे जीवनात त्यांचे ध्येय संग्रहित करण्यासाठी प्रार्थना महत्त्वपूर्ण भूमिका बजावते

Answered by halamadrid
33

■■प्रार्थनेचे महत्व■■

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रार्थनेचे खूप महत्व आहे.प्रार्थनेच्या वेळी आपण देवाला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगतो. आपल्याला जे काही दुख, समस्या ,चिंता आहेत आपण त्या देवासमोर मांडतो.त्यामुळे, आपले मन हलके होते, आपल्याला बरे वाटते.

प्रार्थनेमुळे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.प्रार्थनेमुळे आपल्याला वाईट आणि दुष्ट शक्तिंचा सामना करण्यासाठी शक्ति मिळते. आपला आत्मविश्वास वाढतो.

प्रार्थनेमुळे आपले विचार सकारात्मक बनतात. आपण वाईट विचारांपासून दूर होतो.आपल्या सवयी व जगण्याची पद्धत बदलते.प्रार्थनेमुळे आपला ताण कमी होतो.

प्रार्थनेमुळे, वाईट प्रसंगातून व दुष्ट लोकांपासून आपले संरक्षण होते. आपल्याला कठीण परिस्थितींमध्ये मार्ग सापडतो.

अशा प्रकारे, प्रार्थनेचे खूप महत्व असून आपण प्रत्येकानेच थोडा वेळ प्रार्थनेसाठी कढायला पाहिजे.

Similar questions