India Languages, asked by rchmar83, 1 year ago

Importance of water in marathi easy

Answers

Answered by hardiktare95
1

आपण नेहमी वाचतो, ऐकत असतो की शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, नेहमी पोटाचा त्रास आहे, मलबद्धता आहे तर भरपूर पाणी प्या, अ‍ॅसिडीटीचा त्रास आहे तर, भरपूर पाणी प्या. मूळव्याधीचा त्रास आहे तर, भरपूर पाणी प्या, त्वचा सुंदर ठेवायची असेल तर, पाणी भरपूर प्यावे, असे अनेक प्रकारचे लेख वाचण्यात येतात तसेच सल्लेपण ऐकण्यात येतात. बरेचजण आपल्या आरोग्याचे रहस्य म्हणून पाणी पिण्याच्या सवयी रंगवून सांगत असतात.

झाडांना एकसारखे पाणी देतो का?

बाभळीच्या काटेरी झाडांना, आंब्याच्या झाडांना, संत्री, मोसंबीच्या झाडांना, नारळाच्या झाडांना शेतकरी एकसारखे पाणी देतो का, उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूमध्ये सर्वजण सारख्या प्रमाणात पाणी पितात का, वातानुकूलित वातावणात काम करणा-या व्यक्तिंनी व उष्णतेजवळ काम करणा-या व्यक्तिंनी सारखेच पाणी प्यावे का, शारीरिक कष्ट करणा-यांनी व बौद्धिक श्रम करणा-यांनी सारखेच पाणी प्यावे का ज्या व्य्क्ती नेहमी जास्त प्रमाणात मसाले पदार्थ खातात व जे व्यक्ती साधारण आहार घेतात अशांनी सारखेच पाणी प्यावे का, आजारी असणा-या व्यक्तींनी व आरोग्यवंतांनी सारख्याच प्रमाणात पाणी प्यावे का, यावरून आपल्याला असे लक्षात येते की, मनुष्यांला वयानुसार, ऋतूप्रमाणे, प्रवृत्तीनुसार, व्याधीनुसार, आहार सेवनाप्रमाणे शरीराला पाण्याची गरज वेगवेगळी असते.

Similar questions