in marathi बातमी लेखन बातमीशीर्षक =( बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले
Answers
Answered by
15
Answer:
बातमी लेखन :
बिबट्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ पुणे जिल्ह्यातील ता. मुळशी येथे काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्तपणे वावर होताना दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने परिसरातील अनेक गाई, शेळ्या यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. बिबट्याच्या भीतीमुळे परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
जंगले नष्ट झाल्यामुळे बिबट्यांचे मानवी वसाहतीमध्ये शिरकाव करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.
बिबट्याच्या वास्तव्यामुळे घबराटीचे वातावरण परिसरात पसरलेले असून बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Similar questions