in Marathi letter (formal) what should be written at the end para
Answers
तसदी बद्दल क्षमस्व..
adress
◆◆ मराठीत औपचारिक पत्राचे उदाहरण◆◆
■■ चोरीच्या घटनेबाबत पोलिस निरीक्षकाला लिहिलेले तक्रार पत्र■■
किरण पटेल.
१०४, कृष्ण विहार सोसायटी,
गांधीनगर,
मुंबई.
दिनांक : २७ मार्च,२०२०.
प्रति,
पोलिस निरीक्षक साहेब,
गांधीनगर पोलिस स्टेशन,
मुंबई.
विषय: चोरीच्या घटनेबाबत तक्रार पत्र.
महोदय,
मी,किरण पटेल, गांधीनगरच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीने हे पत्र तुम्हाला लिहत आहे.हे पत्र लिहिण्यामागचे कारण असे आहे की, आमच्या विभागात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे.
आमच्या विभागात चार दिवस आगोदर एक चोरीची घटना घडली. सोमवारी रात्री १० वाजता मी माझ्या कुटुंबासोबत घरी येत होती.
रसत्यावर २ लोकं बाईकवरून जात होते. त्यांनी एक बाईच्या गळ्यातून चेन खेचली आणि ते बाईक घेऊन तिथून पळून गेले. त्या महिलेच्या नवऱ्याने त्याने पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत ते पळून गेले होते.
या घटनेमुळे आमच्या विभागात भीतिचा वातावरण पसरला आहे. कृपा करून आपण या चोरांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करा आणि चोरांपासून रक्षा करण्यासाठी उचित व्यवस्था करा, ही नम्र विनंती.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू,
किरण पटेल.