India Languages, asked by dragoon24, 11 months ago

in Marathi Olympic Games and information about it​

Answers

Answered by muiezkazi
8

आधुनिक ऑलिम्पिक खेळ किंवा ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पोर्टिंग इव्हेंट्सचे नेतृत्व करीत आहेत ज्यात ग्रीष्म andतु आणि हिवाळी क्रीडा स्पर्धा आहेत ज्यामध्ये जगभरातील हजारो खेळाडू विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात.

२० व्या आणि २१ व्या शतकातील ऑलिम्पिक चळवळीच्या उत्क्रांतीमुळे ऑलिंपिक खेळात अनेक बदल झाले आहेत. यापैकी काही समायोजनांमध्ये हिम आणि बर्फ क्रीडासाठी हिवाळी ऑलिम्पिक खेळ, अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी पॅरालंपिक खेळ, 14 ते 18 वर्षे वयोगटातील युथ ऑलिम्पिक गेम्स, पाच कॉन्टिनेंटल गेम्स (पॅन अमेरिकन, आफ्रिकन, आशियाई, युरोपियन, आणि पॅसिफिक) आणि ऑलिंपिक खेळांमध्ये भाग न घेणार्‍या खेळाचे जागतिक खेळ. आयओसीकडून डेफ ऑलिम्पिक आणि स्पेशल ऑलिम्पिकचेही समर्थन केले जाते. आयओसीला विविध प्रकारच्या आर्थिक, राजकीय आणि तांत्रिक प्रगतींमध्ये रुपांतर करावे लागले. ईस्टर्न ब्लॉक देशांद्वारे हौशी नियमांचा गैरवापर केल्यामुळे आयओसीने व्यावसायिक ofथलीट्सच्या सहभागास परवानगी देण्याकरिता, कुबर्टीन यांच्या कल्पनेनुसार शुद्ध हौशीवादापासून दूर होण्यास प्रवृत्त केले. मास मीडियाच्या वाढत्या महत्त्वामुळे खेळांचे कॉर्पोरेट प्रायोजकत्व आणि व्यावसायीकरण हा मुद्दा निर्माण झाला. जागतिक युद्धांमुळे 1916, 1940 आणि 1944 चे खेळ रद्द झाले. शीत युद्धाच्या वेळी मोठा बहिष्कार घालणे 1980 आणि 1984 मधील खेळांमध्ये मर्यादित सहभाग होता.

Pls mark me brainliest

Answered by Anonymous
0

Answer:

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने. प्राचीन ग्रीस देशातील ऑलिंपिया या स्थळी ऑलिंपिक खेळ भरत असत. त्यावरुन या सामन्यांना ऑलिंपिक क्रीडासामने हे नाव पडले.

प्राचीन काळी संस्कृतीच्या उच्च शिखरावर असलेल्या ग्रीस देशात तत्त्वज्ञान, साहित्य, काव्य, शिल्प, स्थापत्य, शिक्षण इ. विषयांप्रमाणे शारीरिक शिक्षणावर विशेष भर दिला जात असे. होमरच्या इलियड व ओडिसी या महाकाव्यातील आकिलीझ व युलिसीझ हे नायक अचाट सामर्थ्य, शौर्य, धैर्य इ. गुणांत तसेच कुस्ती, भालाफेक, मुष्टियुद्ध इ. विद्यांत प्रवीण होते, असे वर्णन आहे. ग्रीकांच्या शिक्षणपद्धतीत शारीरिक शिक्षण, आहार व आरोग्यसंवर्धन यांवर विशेष लक्ष दिले जाई.

त्या काळच्या शारीरिक शिक्षणाचा कस पाहण्यासाठी मर्दानी व मैदानी शर्यतींचे सामने मोठ्या प्रमाणावर भरत असत. या सामन्यांत धावणे, भालाफेक, थाळीफेक, शारीरिक कसरती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचा स‌मावेश असे. या विषयांचे शिक्षण देणार्‍या व्यायामशाळा व आखाडे असत.

ऑलिंपिक ध्वज

ऑलिंपिक ध्वज

ग्रीक लोक धार्मिक वृत्तीचे होते. झ्यूस, अपोलो, हमींझ, अथीना, डिमीटर इ. देवदेवतांची पूजा करून त्यांना प्रस‌न्न करून घेणे हे त्यांचे उद्दिष्ट असे. या धार्मिक वृत्तीतूनच ऑलिंपियन सामन्यांचा उगम झालेला आहे. हे सामने विविध देवदेवतांच्या उत्सवाप्रीत्यर्थ भरविले जात व त्यांत शरीरसामर्थ्य व कौशल्य यांची कसोटी पाहिली जाई. या सामन्यांचा कालावधी सामान्यत: दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या आसपास चारपाच दिवसांचा असे. हे सामने ग्रीकांचा देवाधिदेव झ्यूस याच्या उत्स‌वार्थ भरत व त्यांत भाग घेणारे तरुण तत्पूर्वी दहा महिने सामन्यांसाठी तयारी करीत असत. पहिल्या दिवशी भाग घेणाऱ्या तरुणांची चाचणी व शपथविधी होई. दुसऱ्या दिवशी रथांच्या शर्यती व घोड्यांच्या शर्यती होत. तिसऱ्या दिवशी पौर्णिमेला झ्यूस देवाला प्रसन्न करण्यासाठी आहुती, बलिदान आदी कार्यक्रम स‌काळी होत व दुपारी युवकांच्या विविध शर्यती होत. चौथ्या दिवशी महत्त्वाच्या मैदानी व मर्दानी शर्यती म्हणजे धावणे, कुस्त्या, मुष्टियुद्ध आदी होत. पाचव्या दिवशी ऑलिव्हच्या पर्णांचा मुकुट घालून विजयी वीरांचा स‌न्मान केला जाई व मेजवान्या होऊन स‌मारंभाची सांगता होत असे.

ऑलिंपिक सामने केव्हा व कसे सुरू झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु ऐतिहासिक पुरावा व परंपरा पाहता इ. स‌. पू. ७७६ साली इफिटस या राजाच्या कारकीर्दीत कायदेपंडित लायकरगस याने हे सामने सुरू केले असावेत. तत्पूर्वीही दोनतीन शतके अशाच प्रकारचे पायथियन, नेमियन, इस्थामियन सामने चालू होते, असे होमरच्या इलियड या काव्यातील उल्लेखावरून दिसते. दर चार वर्षांनी भरणाऱ्या या क्रीडामहोत्स‌वात ‘ऑलिंपियड’ ही संज्ञा प्राप्त झाली. हे सामने भरविण्यासाठी वर उल्लेखिलेल्या ऑलिंपिया या वनश्रीयुक्त जागेची योजना होऊन तेथे झ्यूसचे मंदिर बांधण्यात आले व त्यात १२·१९ मी. उंचीचा सुवर्ण, हस्तिदंत व हिरेमाणिकांचा झ्यूसचा पुतळा उभारण्यात आला. त्याच्या स‌भोवती विजयी वीरांचे पुतळे उभारले गेले. मंदिराच्या परिसरात सामन्यांसाठी इमारती, क्रीडांगणे, नाट्यगृह व प्रचंड प्रेक्षागृहही कालांतराने बांधण्यात आले. मुख्य शर्यतीचे मैदान व प्रेक्षागृह फारच भव्य होते. त्यात एका वेळी सु. ५०,०००लोक स‌हज सामावले जात. प्रमुख खेळांच्या शर्यती या प्रेक्षागारामध्येच होत असत. त्याची लांबी १९२ मी. व रुंदी २७·४३ मी. असे. या अंतराला एक ‘स्टेड’ म्हणत व अशा अनेक ‘स्टेड’ अंतरांच्या शर्यती असत. क्रीडांगणावर सामान्यत: भुसभुशीत वाळू पसरलेली असे व भाग घेणारे खेळाडू अनवाणीच धावत असत. शारीरिक कस‌रतींमध्ये संपूर्ण उघड्या शरीराने भाग घ्यावा लागे. त्यामुळे भाग घेणाऱ्या युवकाचे शरीर बांधेसूद आहे किंवा नाही हे स‌मजत असे.

Similar questions