Chemistry, asked by ajrunreddy444, 11 months ago

Info on temple in marathi language ====

Answers

Answered by sreesrh2008
0

Answer:

सात्त्विक रंगसंगतीनं नटलेली, उंचीपुरी नक्षीदार, आकाशाला सुशोभित करीत ढगांना भिडणारी, अस्सल द्रविड शैलीच्या गोपुरांची टोकं दिसू लागली की समजावं, आपण मदुराई शहरात पोहोचलोय. त्या दिशेनं थोडं पुढे गेल्यावर जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, इ. पारंपरिक फुलांचे भलेमोठे हार, त्यांचा मादक सुगंध व तिथं घोटाळणाऱ्या मधमाश्या, दुतर्फा पूजा सामानाची रेलचेल, श्रद्धाळूंची वर्दळ या सर्वाबरोबर आजकाल काहीसा दुर्मीळ झालेला आस्तिकतेचा ओलावा जाणवला की खात्रीनं ओळखावं, आपण मीनाक्षी मंदिराच्या पूर्वगोपुराबाहेर उभे आहोत. सुवर्णयुग, सुखसमृद्धी, भरभराट, निर्यात, विज्ञानशाखांमध्ये नेत्रदीपक प्रगती, श्रेष्ठ कलाविष्कार व टोकाची धार्मिक आस्था या सर्वाचं प्रतीक असलेला, जवळजवळ पासष्ट हजार चौरस मीटरवरील भूभागावर चौदा गोपुरांनी नटलेला हा मंदिर समूह पाहणं ही कलासक्त, शिल्पप्रेमी, अभ्यासक व सामान्य माणसालाही एक अनोखी मेजवानीच होय! इथल्या श्रीमीनाक्षीदेवी व सुंदरेश्वरस्वामी या दोन मुख्य मंदिरांशिवाय एकूण ऐंशीच्या आसपास असलेली उपमंदिरं, मंडप व पुष्करिणी, इ. पूर्णपणे पाहण्यासाठी पूर्ण दिवसही कमीच पडतो. पंडय़ा, चोल व नायक या तीन राजघराण्यांनी सलगपणे ८०० वर्ष याचं बांधकाम केलं, यावरून त्यासाठी आलेल्या खर्चाची व मंदिराच्या अजस्र विस्ताराची कल्पना यावी!

सात्त्विक रंगसंगतीनं नटलेली, उंचीपुरी नक्षीदार, आकाशाला सुशोभित करीत ढगांना भिडणारी, अस्सल द्रविड शैलीच्या गोपुरांची टोकं दिसू लागली की समजावं, आपण मदुराई शहरात पोहोचलोय. त्या दिशेनं थोडं पुढे गेल्यावर जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, इ. पारंपरिक फुलांचे भलेमोठे हार, त्यांचा मादक सुगंध व तिथं घोटाळणाऱ्या मधमाश्या, दुतर्फा पूजा सामानाची रेलचेल, श्रद्धाळूंची वर्दळ या सर्वाबरोबर आजकाल काहीसा दुर्मीळ झालेला आस्तिकतेचा ओलावा जाणवला की खात्रीनं ओळखावं, आपण मीनाक्षी मंदिराच्या पूर्वगोपुराबाहेर उभे आहोत. सुवर्णयुग, सुखसमृद्धी, भरभराट, निर्यात, विज्ञानशाखांमध्ये नेत्रदीपक प्रगती, श्रेष्ठ कलाविष्कार व टोकाची धार्मिक आस्था या सर्वाचं प्रतीक असलेला, जवळजवळ पासष्ट हजार चौरस मीटरवरील भूभागावर चौदा गोपुरांनी नटलेला हा मंदिर समूह पाहणं ही कलासक्त, शिल्पप्रेमी, अभ्यासक व सामान्य माणसालाही एक अनोखी मेजवानीच होय! इथल्या श्रीमीनाक्षीदेवी व सुंदरेश्वरस्वामी या दोन मुख्य मंदिरांशिवाय एकूण ऐंशीच्या आसपास असलेली उपमंदिरं, मंडप व पुष्करिणी, इ. पूर्णपणे पाहण्यासाठी पूर्ण दिवसही कमीच पडतो. पंडय़ा, चोल व नायक या तीन राजघराण्यांनी सलगपणे ८०० वर्ष याचं बांधकाम केलं, यावरून त्यासाठी आलेल्या खर्चाची व मंदिराच्या अजस्र विस्ताराची कल्पना यावी!पांडवांशी रक्ताचं नातं असलेल्या पांडय़ा राजघराण्यातील कुलेश्वर राजाच्या काळात, कदंबवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात एक स्वयंभू लिंग सापडलं. काही कालानं त्या संरक्षित स्वयंभू शिवलिंगावर कुलशेखर राजाने एक सुंदर मंदिर उभारलं. प्राचीन काळी पूर्ण लाकडाचं व त्यानंतर दगडीविटा व त्याहीनंतर सातव्या शतकात ते पूर्णपणे दगडाचं बनविलं गेलं असाव असा तज्ज्ञांचा कयास आहे. त्या कालातील वास्तुपंडितांशी सल्लामसलत करून निसर्गातील अदृश्य ऊर्जा, पंचमहाभूतांचं संतुलन व वास्तुशिल्पशास्त्रांच्या सूत्रांचं काटेकोर पालन करून बांधलेली ही वास्तू लोकप्रियता व प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. द्रविड स्थापत्यकलेचा जणू आरसाच असलेला हा मंदिरसमूह, ८४७ फूट लांब व ८०० फूट रुंद व ४० फूट उंच अशा दणकट दगडी, भिंतीमध्ये सुरक्षित आहे. अत्यंत जागृत असल्याने विदेशी आक्रमण व मूर्तिभंजकांच्या तावडीतून हे अनेक वेळा सुटलं. इथं शिवाच्या ६४ लीलांचं दर्शन होतं. यात चौदा गोपुरं, १५०० पेक्षा जास्त खांब व अनेक मंडप या सर्वाच्या अवाढव्य पसाऱ्यामुळे मार्गदर्शनाशिवाय एकदा प्रवेश केलेली व्यक्ती मंदिराबाहेर येऊच शकत नाही. म्हणून इथली अंतर्रचना समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.

Similar questions