informal letter format in marathi SSC board
Answers
Explanation:
श्री प्रकाश गोविंद राजे
गंगा को ओप. हौसिंग सोसायटी,
फ्लॅट नं ४१५, चौथा माळा,
आंबेडकर रोड, आंबेडकर नगर,
पुणे, पिन – ४११००२.
२० जुलै २०१८.
प्रति,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
पुणे महानगर पालिका,
पुणे, ४११००१.
विषय :- घंटागाड़ी वेळेवर येणेबाबत.
महाशय,
मी श्री प्रकाश गोविंद राजे, आंबेडकर नगर येथे राहतो. गेले कांही दिवस आमच्या विभागात कचरा गोळा करण्यास घंटा गाड़ी वेळेवर येत नाहीं, किंवा कधी कधी येतच नाहीं. न येण्याबाबत काहीही सूचना दिली जात नाहीं.
आमचा विभाग अतिशय गजबजलेला असून, एकूण २५ सोसायट्या आहेत. एका सोसायटी मध्ये सरासरी १० फ्लॅट असल्यामुळे येथे एकूण २५० फ्लॅट आहेत. घंटागाड़ी न आल्यास इतक्या फ्लॅटसचा कचरा दररोज जमा होतो आणि कांही जण रस्त्यावर फेकतात. त्या मुळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. त्यात मोकाट कुत्री आणि जनावरे यथेच्छ फिरत असतात. घाणीमुळे वास आणि डास/मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
सध्या डेंग्यु, मलेरिया इत्यादि रोगांच्या साथी चालू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण जातीने ह्या बाबतीत लक्ष घालून संबन्धित घंटागाडीच्या ठेकेदाराला समज द्यावी आणि यापुढे घंटा गाड़ी वेळेवर येईल हयाची काळजी घ्यावी ही विनंती.
आपला,
प्रकाश गोविंद राजे.