Hindi, asked by sakshi577707441, 9 months ago

informal letter to class teacher for leave to Ganesh chaturthi in Marathi​

Answers

Answered by AadilAhluwalia
6

अ. ब.क

मंगल सोसायटी,

आझाद नगर,

नागपूर-९९

प्रति,

वर्ग शिक्षिका,

८वी-क ,

समता विद्यालय,

नागपूर-९९

विषय- गणेश चतुर्थीसाठी सुट्टी मागण्याकरिता.

आदरणीय शिक्षिका,

मी, अ. ब.क. इयत्ता ८वी मध्ये आहे. माझा हजेरी क्रमांक ०९ आहे. मी हे पत्र गणेश चतुर्थी साठी सुट्टीकरिता लिहीत आहे. मला गणपती साठी गावी जायचं असून मला सुट्टी हवी आहे. शाळेची सुट्टी पाच दिवस तर आहे पण आमचा गावी १० दिवस गणपती बसवला जातो. ह्या कारणास्तव मला आणखी ५ दिवसांची सुट्टी मिळावी अशी विनंती आहे. गावी कोणी नसत, म्हणून आम्हाला जाणे भाग आहे. बाप्पांची सगळी व्यवस्था आम्हाला तिथे जाऊन करावी लागते.

शाळेत घेतलेला अभ्यास मी लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करीन. त्रास दिल्याबद्दल माफी असावी.

तुमचा विश्वासू विद्यार्थी,

अ. ब.क.

Similar questions