India Languages, asked by Krishnanshukhilare, 11 months ago

information about a scientist in Marathi​

Answers

Answered by harshrajsingh567
3

Explanation:

ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्रा निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.

Answered by prince2228
1

Answer:

अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन (इंग्रजी: Albert Einstein ;) (मार्च 14, इ.स. १८७९ - एप्रिल १८, इ.स. १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून ओळखले जाऊ लागले. आइन्स्टाइन यांनी "अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी आइन्स्टाइन यांनी विचार केला की, ही विद्युत चुंबकीय नियमांसोबत पारंपरिक यांत्रिकीच्या नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे गुरुत्वाकर्षणाचेच सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून सामान्य सापेक्षता सिद्धान्तावर एक पेपर प्रकाशित केला. सांख्यिकीय यांत्रिकी आणि पुंजयांत्रिकी सिद्धान्त यांच्या समस्यांची उकल करण्यायास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या आण्विक सिद्धांत आणि रेण्विक गती या संबंधित सिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाशकणांचा सिद्धान्त मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली

Similar questions