Information about dr homi bhabha
in marathi
Answers
Answer:
अनुशक्तिकेंद्राचा निर्माता होमी जहांगीर भाभा
जन्म-३० ऑक्टोंबर १९०९
मृत्यू-२४ जानेवारी १९६६
भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी, सुसंस्कृत माणसे तयार झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर,प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून, थोर विचारवंत म्हणून ‘होमी जहागीर भाभा’ यांचे नाव भारतात मोठ्या आदराने व प्रेमाने घेतले जाते. स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. त्यांचा जन्म ३० ऑक्टोंबर,१९०९ साली झाला .
भारत स्वतंत्र झाला तेव्हा अणुयुगाने एक नवे पर्व जगात सुरु केले. नागासाकी व हिरोशिमा ही जपानमधील दोन शहरे बेचिराख करून पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या वैज्ञानिक प्रगतीचे भयानक चित्र दाखवून दिले. अण्वस्त्रांनी किती भयंकर मानवसंहार व हानी होऊ शकते याचे एक उदाहरण दाखवून दिले.
होमी भाभांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली,तेव्हा मुल कण, नवे सिद्धांत नवे तंत्रे उदयास आली होती. त्यात भाभांनी भर टाकली. अंतराळातून येणाऱ्या विश्वकिरणात समुद्रासपाटीला असलेल्या वातावरणातील कवच फेटून इलेक्ट्रान कसे पोहोचतात आणि विश्वकिरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा होतो,याचा कॉस्केड थिअरीने करण्यात त्यांना यश मिळविले प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रोनची पदार्थाशी आंतरक्रिया होताच त्यातून गॉमा किरण बाहेर पडतात. त्या किरणांमुळे इलेक्ट्रोन वा पॉझिट्रौन यांचे विकरण कसे होते, याचा सिद्धांत मांडतांना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईस्टाईच्या सिद्धांतानुसार होणारी कालवृद्धी लक्षात पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले.
त्यांनी अनेक संस्था उभारल्या. तुर्भ,तारापूर अणुशक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मुलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग,ऊर्जा आयोग,अवकाश संशोधन, कॉन्सर संशोधन अशा मानवकल्याणकारी संस्थातून अणुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. भारत सरकारने १९५४ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
२० जानेवारी १९६६ रोजी विमान अपघाटात त्यांचे निधन झाले.
mark me and brainlist